इमेज
  ८० पेक्षा अधिक स्पर्धकांतून आनंद वाव्हळे ठरले अव्वल गायक पुणे (खराडी): दिनांक ५ एप्रिल २०२६, रविवार रोजी सारनाथ बुद्ध विहार, खराडी (पुणे) येथे मराठी/हिंदी गीत गायन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सदर स्पर्धा कराओके ट्रॅकवर आधारित असून पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील विविध भागांतून ८० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली असून प्रत्येक स्पर्धकाने आपली गायनकला प्रभावीपणे सादर केली. या स्पर्धेत आनंद वाव्हळे यांनी आपल्या सुरेल आणि प्रभावी गायनाने परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक अनुराधा डंबाळे यांनी मिळवला, तर प्रसाद उलांडे आणि गोविंद कांबळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या आनंद वाव्हळे यांचा सारनाथ बुद्ध विहार येथील महिला संघाच्या हस्ते सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांचे प्राचार्य अनिल शिंदे व प्राध्यापिका शुभांगी शिंदे, यश भोरे ,किशोर भोरे व अनंत पवार ,रणजीत गोदाम,अंकुश सावंत ,नितीन मोहिते रामेश्वर बचाटे व शेखर जाधव यांनी कौतुक करून पुढील वा...

समन्वयातून मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार

अतिक्रमण हटाव मोहिम : परळीतील व्यापाऱ्यांचा बैठकीत सकारात्मक प्रतिसाद !





नगर परिषद प्रशासन आणि व्यापारी यांच्या समन्वयातून मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार

परळी वैजनाथ | प्रतिनिधी

       परळी नगर परिषदेकडून शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सध्या वेगाने सुरू असून, या पार्श्वभूमीवर मोंढा मार्केट परिसरातील व्यापाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शहर स्वच्छ, सुंदर आणि वाहतुकीसाठी सुरळीत करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेला व्यापाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 

    अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडी वाढते, ग्राहकांना दुकानांपर्यंत पोहोचणे कठीण होते, अपघातांचा धोका वाढतो तसेच मान्सूनपूर्व नालेसफाईत अडथळे निर्माण होतात. याशिवाय शहराच्या सौंदर्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे मत सर्वच उपस्थितांनी मांडले.चर्चेदरम्यान वाढत्या अतिक्रमणामुळे शहराच्या विकासाला अडथळा निर्माण होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे, अतिक्रमणाचा सर्वाधिक फटका हा व्यापाऱ्यांनाच बसत असल्याचेही बैठकीत अधोरेखित झाले. पार्किंगची अडचण आणि मोकळ्या जागेअभावी ग्राहक अन्यत्र वळत असल्याने व्यापारावर परिणाम होत असल्याची बाब समोर आली. बैठकीत अनेक व्यापाऱ्यांनी स्वखुशीने अतिक्रमण काढून घेण्याचे आश्वासन दिले. नगर परिषद प्रशासन आणि व्यापारी संघटनेच्या समन्वयातून मोंढा मार्केट परिसरात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त शहर घडविणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.  परळी शहरातील  जवळपास सर्वच रस्त्यांवर अतिक्रमणं मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत. अतिशय सुटसुटीत व  वाहतूकीला  विना अडथळा असे  समर्पक रुंद रस्ते  असतांनाही वाहतूक कोंडी, अस्ताव्यस्त रचना आणि बेशिस्त पार्किंग यामुळे सर्वांनाच प्रचंड त्रासातून जावे लागत आहे. त्यामुळे  आपणच आपले शहर सुटसुटीत आणि शिस्तबद्ध  करुया ,हे सर्वांसाठीच आवश्यक आहे हा  परळीकर व्यापारी, व्यावसायिक व सर्व नागरिकांचा मनापासून निर्धार आहे.त्यामुळेच नगर परिषद प्रशासन आणि परळीकर व्यापारी यांच्या समन्वयातून मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे.

     हनुमान मंदिर, मोंढा मार्केट येथे झालेल्या या बैठकीला माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधीकारी, बाजार समितीचे संचालक जयपाल लाहोटी,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानोबा माऊली फड, नंदकिशोर बियाणी, बंडु गरुड,संदीप लाहोटी, शंकर आडेपवार, नितीन समशेट्टी, पारसेवार, गोपाळ कंकाळ आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगर परिषदेचे अधिकारी, विविध व्यापारी महासंघाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....