मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज बांधव उपस्थित...

इमेज
परळीत ‘ गो सन्मान आव्हान अभियान’ अंतर्गत तहसीलदारांना निवेदन सादर; गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘गो सन्मान आव्हान अभियान’ अंतर्गत आज परळी वैजनाथ येथे विविध हिंदुत्ववादी संघटना आणि गो-प्रेमींच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. गोमातेला 'राष्ट्रमाता' घोषित करावे आणि गोवंश हत्या बंदीसाठी कठोर केंद्रीय कायदा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे अभियान देशातील ५००० हून अधिक तहसील कार्यालयांत] एकाच वेळी राबविण्यात आले.       परळी शहरात सकाळी या अभियानानिमित्त औद्योगिक वसाहत सभागृहापासून शांततामय मार्गाने पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर गो-भक्तांनी एकत्रितपणे तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनात प्रामुख्याने गोमातेला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असल्याने तिला अधिकृतपणे 'राष्ट्रमाता' म्हणून घोषित करावे.,,संपूर्ण देशात गोवंश हत्या पूर्णपणे बंद करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा अमलात आणावा:,बेवारस आणि वृद्ध गोवंशाच्या संगोपनासाठी असलेल्या ग...

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले

केज:- केज तालुक्यातील एका गावातून एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला एका भिन्न धर्मीय तरूणाने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले आहे.

दि. २३ एप्रिल रोजी एका मुलीचे आई-वडील हे नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी नेकनुर येथे गेले होते. रात्री आई-वडील घरी आल्या नंतर त्यांना त्यांची मुलगी घरी नसल्याचे निदर्शनास आल्या नंतर त्यांनी मुलीचा शोध घेतला. मात्र मुलगी आढळून आली नाही. त्या नंतर मुलीच्या भावाच्या मोबाईल नंबरवर त्यांना अंबाजोगाई तालुक्यातील एका गावच्या ग्रामपंचायत सदस्याने कळविले की, बेपत्ता असलेल्या मुलीला घेऊन, एक भिन्न धर्मीय तरुण हा अंबाजोगाई तालुक्यातील त्याच्या आजोळी गेलेला आहे.

मुलीच्या वडिलांच्या तक्रारी वरून त्यांच्या गावातील भिन्न धर्मीय इसम हा  त्याच्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून गेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी केज पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून भिन्न धर्मीय इसमा विरुद्ध गु. र. नं. २४३/२०२६ भा. न्या. सं. १३७(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....