मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज बांधव उपस्थित...
परळी वैजनाथ शहरातील १ ते १७ प्रभागांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी पाईप लाईनची कामे होणार
१५ व्या वित्त आयोगातून शहरातील आवश्यक त्या ठिकाणच्या सहा किलोमीटर पाईपलाईनच्या कामांना मंजुरी - नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी
परळी वैजनाथ: प्रतिनिधी...
परळी वैजनाथ शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या कामांना जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या बंधनकारक अनुदानातून एकूण १ कोटी ९६ लाख ९५ हजार ६३९ रुपयांच्या निधीला ही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे परळी वैजनाथ शहरातील प्रभाग क्रमांक एक ते सतरा या प्रभागांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी पाणी पुरवठा पाईप लाईनची विस्तारीत कामे होणार आहेत. सर्व प्रभागांमध्ये मिळून एकूण सहा किलोमीटरची पाईपलाईन ची कामे यामधून केली जाणार आहेत. अशी माहिती नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली आहे.
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना पंकजाताई मुंडे व माजी मंत्री आ धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी वैजनाथ नगरपरिषदेने शहरातील प्रभाग १ ते १७ मध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी विस्तारित नवीन पाईप लाईन टाकण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बीड यांनी तांत्रिक मान्यता दिल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम प्रशासकीय मंजुरी दिली आहे.शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मंजूर रक्कम ही पाणीपुरवठा व्यवस्थापन, पाण्याचे शुद्धीकरण आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी वापरली जाणार आहे. सध्याच्या मंजुरीनुसार, शहरातील प्रभाग क्रमांक एक ते 17 या प्रभागांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी पाणीपुरवठ्याची पाईप लाईन विस्तारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.या निर्णयामुळे परळी शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असून ज्या भागात पाईप लाईन नव्हती त्या ठिकाणी विस्तारित पाईप लाईन टाकली जाणार आहे. मंजूर निधीमधून विविध प्रभागांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी पाईपलाईन ची मंजूर असलेली एकूण सहा किलोमीटरची कामे केली जाणार आहेत. या अनुषंगाने पाणी पुरवठयाबाबत नागरिकांना दिलासा मिळणार आहे असा विश्वास नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, उपनगराध्यक्षा खैसर राजाखान पठाण, पाणी पुरवठा सभापती सौ जयश्रीताई गीते, मुख्याधिकारी पी एन निगळ यांनी व्यक्त केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा