पनवेल-नांदेड शिवाजीनगरलाच तीन तासांपासून अडकली :
श्री संत जगमिञ नागा मंदिर येथे फिरता अखंड हरिनाम सप्ताह ;हरिनामाचा गजर
फिरता अखंड हरिनाम सप्ताहाची कल्याच्या कीर्तननाने होणार सांगता ; आज ह. भ. प. वसंत महाराज थोरमले यांचे कीर्तन
भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
श्री संत महान तपस्वी जीवनेश्वर काळुबाबा व आद्यग्रामदैवत श्री कालभैरवनाथ कृपेने व वैकुंठवासी प.पू गुरुवर्य ह भ प बबन महाराज यांच्या प्रेरणेने व ह. भ. प. वसंत महाराज थोरमले (उत्तराधिकारी) यांच्या मार्गदर्शनाने फिरता अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत असून महाराष्ट्रातील थोर संत मंडळींची कीर्तन व प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी ह. भ. प. वसंत महाराज थोरमले यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. तरी पंचक्रोशीतील व सर्व भाविक भक्तांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
परळी वैद्यनाथ शहरापासून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या पावन नगरीपासून जवळच लाखों भाविकांचे श्रद्धास्थान श्री संत जगमिञ नागा मंदिर येथे परळी वैजनाथची जगमित्र नागा | ध्यानी पांडुरंग आठवितो || श्री संत महान तपस्वी जीवनेश्वर काळुबाबा व आद्यग्रामदैवत श्री कालभैरवनाथ कृपेने व वैकुंठवासी प.पू गुरुवर्य ह भ प बबन महाराज यांच्या प्रेरणेने व ह. भ. प. वसंत महाराज थोरमले (उत्तराधिकारी) यांच्या मार्गदर्शनाने २२ वे फिरता अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री संत तुकाराम महाराज गाथा पाचवा वेद भव्य दिव्य असा पारायण सोहळा संपन्न होत आहे. बुधवार दि. २२ ते २८ एप्रिल दरम्यान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे गाथा पारायण नेतृत्व ह.भ.प. गोपीनाथ महाराज पिठे-शिवरे, ह.भ.प. प्रभाकर महाराज दांडेकर, ह.भ.प.पुंडलिक महाराज चव्हाण- कसबे सुकेने, पहाटे ४ ते ६ काकड आरती, ६ ते ६. ३० वाजता विष्णुसहस्त्रनाम व हनुमान चालीसा, ७ ते १०. ३० वाजता गाथा पारायण, दररोज दुपारी १ ते २. ३० स्थानिक ग्रंथ वेळ, ४. ३० ते ५. ३० वाजता प्रवचन, ५. ३० ते ६. ३० वाजता सामुदायिक हरिपाठ, ७ते ९ वाजता हरी किर्तन नंतर भोजन, रात्री १० वाजे नंतर जागर भजन तसेच महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे कीर्तन पुढील प्रमाणे दि. २२ एप्रिल रोजी ह.भ.प. नितीन महाराज कोपरे, वडनेर भैरव, दि. २३ एप्रिल रोजी ह.भ.प. श्रीराम महाराज सेवानिवृत्त पीएसआय परळी वैजनाथ, दि. २४ एप्रिल रोजी ह.भ.प. प्रा. शाम महाराज नेरकर परळी वैजनाथ, दि. २५ एप्रिल रोजी ह.भ.प. ह भ प लक्ष्मण महाराज कुंडगर, परळी वैजनाथ, दि. २६ एप्रिल रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बादाडे बीड, दि. २७ एप्रिल रोजी ह.भ.प. अॅड. दत्तात्रय महाराज आंधळे, परळी वैजनाथ यांचे कीर्तन झाले. तसेच दुपारी ३ते ५ नगर प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी भजनी मंडळ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचक्रोशीतील सर्व महंत, कीर्तनकार, प्रवचनकार गायक राजकीय सामाजिक शैक्षणिक ग्रामस्थ उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. विशेष सहकार्य श्री संत जगमित्र नागा मंदिर देवल कमिटी व विश्वस्त भक्त मंडळ, शेषराव रघुनाथ सूर्यवंशी, परळी वैजनाथ , श्री संत जिवनेश्वर काळुबाबा मित्र मंडळ करंजवण खेडले, निगडाडोळ, उमराळे, घोडेवाडी, बहादूरी, ओझरखेड, पिपंळणारे, तिसगांव, सोनगाव, आंबेवणी, वरखेडा साडगाव व श्री संत जगमित्र नागा पुजारी औटी यांचे ही विशेष सहकार्य लाभले. फिरता अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यास भाविकांची होती.
फिरता अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत असून महाराष्ट्रातील थोर संत मंडळींची कीर्तन व प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी ह. भ. प. वसंत महाराज थोरमले यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. तरी पंचक्रोशीतील व सर्व भाविक भक्तांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा