मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज बांधव उपस्थित...

इमेज
परळीत ‘ गो सन्मान आव्हान अभियान’ अंतर्गत तहसीलदारांना निवेदन सादर; गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘गो सन्मान आव्हान अभियान’ अंतर्गत आज परळी वैजनाथ येथे विविध हिंदुत्ववादी संघटना आणि गो-प्रेमींच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. गोमातेला 'राष्ट्रमाता' घोषित करावे आणि गोवंश हत्या बंदीसाठी कठोर केंद्रीय कायदा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे अभियान देशातील ५००० हून अधिक तहसील कार्यालयांत] एकाच वेळी राबविण्यात आले.       परळी शहरात सकाळी या अभियानानिमित्त औद्योगिक वसाहत सभागृहापासून शांततामय मार्गाने पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर गो-भक्तांनी एकत्रितपणे तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनात प्रामुख्याने गोमातेला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असल्याने तिला अधिकृतपणे 'राष्ट्रमाता' म्हणून घोषित करावे.,,संपूर्ण देशात गोवंश हत्या पूर्णपणे बंद करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा अमलात आणावा:,बेवारस आणि वृद्ध गोवंशाच्या संगोपनासाठी असलेल्या ग...

 राज्य शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाच्या वतीने माहितीपटासाठी पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरात  चित्रीकरण



परळी वैजनाथ, प्रतिनिधी -

राज्य शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाकडून एक राज्यातील प्रमुख शक्तिपीठं, ज्योतिर्लिंगांसह प्रमुख तीर्थस्थळं, धार्मिक ठिकाणांची विस्तृत माहिती देणारा ‘भक्ति-पर्यटना’वरील माहितीपट तयार करण्यात येत आहे. जागतिकस्तरावर माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीने तयार करण्यात येणाऱ्या माहितीपटासाठी प्रत्यक्ष त्या-त्या गाव-शहरांमध्ये जाऊन चित्रीकरण करण्यात येत आहे. रविवारी अंबाजोगाईत आणि परळी-वैजनाथ येथे ‘भक्ति-पर्यटना’साठी चित्रीकरण पार पडले.

मराठवाड्यातील देवीची साडे तीन पीठांपैकी असलेली ठिकाणी आणि बारा ज्योतिर्लिंगांमधील तीन मंदिरांसह अन्य काही स्थळांचे माहितीपटासाठी चित्रीकरण करण्यात येत आहे. रविवारी अंबाजोगाईत आणि परळी-वैजनाथ येथे ‘भक्ति-पर्यटना’साठी चित्रीकरण पार पडले.सोमवारी माहूर, नांदेडचा गुरुद्वारा, आैंढा-नागनाथ आदी धार्मिक स्थळांच्या ठिकाणी चित्रीकरण होणार आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाकडून एक राज्यातील प्रमुख शक्तिपीठं, ज्योतिर्लिंगांसह प्रमुख तीर्थस्थळं, धार्मिक ठिकाणांची विस्तृत माहिती देणारा ‘भक्ति-पर्यटना’वरील माहितीपट तयार करण्यात येत आहे. जागतिकस्तरावर माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीने तयार करण्यात येणाऱ्या माहितीपटासाठी प्रत्यक्ष त्या-त्या गाव-शहरांमध्ये जाऊन चित्रीकरण करण्यात येत आहे. रविवारी अंबाजोगाईत, परळी-वैजनाथ येथे ‘भक्ति-पर्यटना’साठी चित्रीकरण पार पडले.

मराठवाड्याचे एक द्वार असलेल्या तुळजापुरात तुळजाभवानी मंदिर परिसराचे चित्रीकरण नुकतेच पार पडले. रविवारी चित्रीकरणातील चमूने अंबाजोगाईत योगेश्वरी देवीचे व परळीत पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिर परिसराचे छायाचित्रण केले. सोमवारी माहूरची रेणुका माता, हिंगोलीतील आैंढा नागनाथ येथील ज्योतिर्लिंग, नांदेडमधील गुरुद्वारा, नरसी-नामदेव या तीर्थस्थळी जाऊन चित्रीकरण करण्यात येणार आहे. मराठवाड्यात तुळजापूरची देवी, माहूरची रेणुका माता ही दोन प्रमुख शक्तिपीठ आणि कोकणास्थांचे कुलदैवत असलेली योगेश्वरी देवी, तर छत्रपती संभाजीनगरजवळील घृष्णेश्वर, बीडमधील परळी वैजनाथ व आैंढा नागनाथ हे तीन ज्योतिर्लिंग आहेत.

"शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाकडून जागतिकस्तरावर महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठं, ज्योतिर्लिंग व अन्य देवस्थान स्थळांना पोहोचवण्यासाठी ‘भक्ति-पर्यटन’ हा माहितीपट तयार करण्यात येत आहे. पंढरपूरनंतर आम्ही मराठवाड्यातील तुळजापूर, तेर येथील चित्रीकरण करून रविवारी अंबाजोगाई व परळीत पोहोचलो. या पटाचे दिग्दर्शक शुभंकर करंडे आहेत." 

    - मंदार देशपांडे, कार्यकारी निर्माता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....