इमेज
 " मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी; घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन!" परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... "मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी दिली. त्यानंतर ती एकटीच असताना घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरवट ता. परळी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. आरमान मुबारक शेख रा. मिरवट ता. परळी वै हा पीडिता मुलगी ही घरी एकटी असतांना तिच्या घरी जाऊन " तु मुझे रात को खंडोबा मंदीरके पास मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" असे म्हणुन धमकी दिली. पीडितेचा हात धरुन त्याने तिला जवळ ओढुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी धमकी व विनयभंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पुढील तपास पोउपनि निमोणे हे करीत आहेत. 2

बाबासाहेबांनी बहुजनांच्या उद्धारासाठी शिक्षणाचे शस्त्र दिले  - रानबा गायकवाड 



कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून लावावी - प्रा.दासू वाघमारे 

परळी प्रतिनिधी.     भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशातील उपेक्षित गावकुसाबाहेरच्या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी शिक्षण कायद्याने शिक्षण सक्तीचे केले होते. परंतु बहुजनांना बाबासाहेबांनी दिलेले शिक्षणाचे हे शस्त्र हिरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. हा कुटील डाव बहुजन समाजाने हाणून पाडावा असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी केले. ते परळी तालुक्यातील इंजेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या महामानव,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. 

    तालुक्यातील मौजे इंजेगाव येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड तर रिपाईचे राज्यसचिव भास्कर नाना रोडे, मराठवाडा उपाध्यक्ष प्रा. दासू वाघमारे, सरपंच अमोल कराड ,सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम गवळी, राम भिसे, पोलीस पाटील हरिभाऊ कराड ,गुरू कराड, महाराष्ट्र न्यूज 1 चे संपादक श्रीमंत खांडेकर , अण्णा गवळी, अंकुश गवळी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भास्कर नाना रोडे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

   यावेळी पुढे बोलताना रानबा गायकवाड म्हणाले की, बाबासाहेबांची जयंती म्हणजे यात्रा नाही तर विचारांची जयंती आहे. प्रबोधनाची जयंती आहे.तो विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी,हजारो वर्षांच्या गुलामीच्या बेड्या तोडून माणूस म्हणून आपणाला हक्क आणि अधिकार देणा-या महामानवाला अभिवादन करण्यासाठी जयंतीला आले पाहिजे. ज्या शिक्षणाच्या बळावर आपली प्रगती झाली त्या शिक्षणावरच घाव घालण्याचे काम चालू आहे.अनेक सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत.यावेळी रिपाईचे राज्यसचिव भास्कर नाना रोडे, मराठवाडा उपाध्यक्ष प्रा.दासू वाघमारे, सरपंच अमोल कराड,मुक्ताराम गवळी यांनी आपले विचार मांडले.तसेच लहान विद्यार्थी व विद्यार्थिनी पृथ्वीराज विजय गवळी,चि.वंश शिवशंकर गवळी,कु.आरोही दयानंद गवळी यांनी उत्कृष्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषणं केली.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्ताराम गवळी यांनी केले तर उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आनंद तुपसमुद्रे यांनी केले. कार्यक्रमास रामेश्वर शिंदे, निवृत्ती गवळी, दिनकरराव शिंदे, परमेश्वर शिंदे, यशवंत सोनवणे, बबन (दादा)  नाटकर, सचिन मुंडे, क्षणिक शिंदे, निलेश क्षिरसागर, अमोल क्षिरसागर, अतुल गवळी, सुरज सोनवणे यांच्या सह महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अमोल गवळी, उपाध्यक्ष शिवशंकर गवळी, सचिव नितीन आरगडे, सहसचिव विजय गवळी, कोषाध्यक्ष दयानंद गवळी व इतर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या