महापुरुषांच्या विचारांचे प्रचारक निर्माण व्हावेत - नितीन सावंत
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणावेत - मुख्य अभियंता सुनील इंगळे
परळी / प्रतिनिधी:
परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव समारोपाचा कार्यक्रम दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून नितीन सावंत उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे हे होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना व्याख्याते नितीन सावंत म्हणाले की, "आज प्रतिगामी शक्ती देशांतर्गत डोके वर काढत असताना, समतेचे पुरस्कार करणाऱ्या महामानवांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रचारक निर्माण होण्याची गरज आहे."तसेच, कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे केवळ वाचण्यापुरते मर्यादित न ठेवता ते दैनंदिन जीवनात आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
या कार्यक्रमास उपमुख्य अभियंता हिम्मत अवचार, अधीक्षक अभियंता राजू रेड्डी, धनंजय कोकाटे, प्रसन्नकुमार गरुड, सहायक कल्याण अधिकारी शरद राठोड, सौ. अनिता सुनील इंगळे, शितल मगरे मॅडम, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी बी. आर. अंबड, संजय उदार, निखिल मेश्राम, कार्यकारी अभियंता सुमित गायकवाड, कार्यकारी अभियंता पंकज दगडे, उपकार्यकारी अभियंता श्रीकांत इंगळे, डी. एस. डोंगरे, कामगार नेते संदीप पाटील, हरिराम गित्ते, लक्ष्मण शिंदे, वैजनाथ चाटे, भगवान साकसमुद्रे,अरुण गीते, राजू गजले आणि संघरक्षित मस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
जयंतीनिमित्त सकाळी प्रशासकीय इमारतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर माजी सैनिक मेस्को च्या वतीनेही अभिवादन करण्यात आले. यानंतर प्रेरणा सार्वजनिक वाचनालयाच्या समोर प्रबोधन कार्यक्रम आणि विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा मुख्य सोहळा पार पडला. जयंती उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियंता एस. एल. होटकर यांनी केले, सूत्रसंचालन प्रदीप चव्हाण यांनी केले, तर उपस्थितांचे आभार बप्पा वडमारे यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा