इमेज
 " मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी; घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन!" परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... "मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी दिली. त्यानंतर ती एकटीच असताना घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरवट ता. परळी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. आरमान मुबारक शेख रा. मिरवट ता. परळी वै हा पीडिता मुलगी ही घरी एकटी असतांना तिच्या घरी जाऊन " तु मुझे रात को खंडोबा मंदीरके पास मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" असे म्हणुन धमकी दिली. पीडितेचा हात धरुन त्याने तिला जवळ ओढुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी धमकी व विनयभंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पुढील तपास पोउपनि निमोणे हे करीत आहेत. 2

सर्व स्तरातून अभिनंदन......!!!!

 यश इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या सीबीएसई दहावीच्या पहिल्याच बॅचचा १०० टक्के निकाल 




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

        ग्रामीण भागातील दिंद्रुड येथील यश इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या शाळेचा CBSE बोर्डाचा 10वीच्या पहिल्या बॅचचा 100 टक्के निकाल लागलेला आहे. 

            दिंद्रुड येथील यश इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवत CBSE बोर्डाच्या दहावीच्या पहिल्याच बॅचमध्ये १०० टक्के निकालाची अभिमानास्पद कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद आहे. या शाळेतील बहुतांश विद्यार्थी हे गोरगरीब व ऊसतोड मजुरांच्या कुटुंबातील असून, प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे आणि विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक निकाल लागला आहे. शाळेच्या या यशामुळे दिंद्रुड परिसरात शिक्षणाची नवी दिशा निर्माण झाली असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही ही कामगिरी प्रेरणादायी ठरणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शाळेचे ध्येय असल्याचे या निकालातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या उल्लेखनीय यशाचे श्रेय शाळेचे प्राचार्य, सर्व शिक्षकवृंद तसेच संस्थेच्या व्यवस्थापनाला जाते. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री प्रदीपजी खाडे सर आणि संचालक माननीय श्री विलाजी खाडे सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.   

     यश इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या CBSE दहावीच्या पहिल्याच बॅचने १०० टक्के निकालाची नोंद करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद आहे. गोरगरीब व ऊसतोड मजुरांच्या कुटुंबातील मुलांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर १००% निकाल मिळवून दिला, ही आमच्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे.”  अशी प्रतिक्रिया प्रदीप खाडे  अध्यक्ष :  कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी  संस्था लातूर, सहसचिव : नाथ शिक्षण संस्था परळी वैजनाथ यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या