इमेज
 " मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी; घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन!" परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... "मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी दिली. त्यानंतर ती एकटीच असताना घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरवट ता. परळी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. आरमान मुबारक शेख रा. मिरवट ता. परळी वै हा पीडिता मुलगी ही घरी एकटी असतांना तिच्या घरी जाऊन " तु मुझे रात को खंडोबा मंदीरके पास मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" असे म्हणुन धमकी दिली. पीडितेचा हात धरुन त्याने तिला जवळ ओढुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी धमकी व विनयभंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पुढील तपास पोउपनि निमोणे हे करीत आहेत. 2

तब्बल पंचवीस तास चालतो पालखी सोहळा

 दिडशे वर्षांची परंपरा असलेल्या श्री.पापदंडेश्वराचा पालखी सोहळा उत्साहात 


परळी वैजनाथ दि.१५ (प्रतिनिधी)

                तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे दिडशे वर्षांची परंपरा असलेला श्री. पापदंडेश्वराचा पालखी सोहळा बुधवारी (ता.१५) पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.

        गेल्या दिडशे वर्षाहून अधिक वर्षाची परंपरा असलेला ग्रामदैवत श्री. पापदंडेश्वराच्या पालखी सोहळ्याचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. गाढे पिंपळगाव येथे श्री.पापदंडेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन बुधवार (ता.०८) ते बुधवार (ता.१५) पर्यंत करण्यात आले होते. या कालावधीत तृप्ती पवार यांची शिव कथा दुपारी १ ते ५ दरम्यान आयोजन करण्यात आली होती. ज्ञानेश्वरी पारायणासह विविध धार्मिक कार्यक्रम भजन,किर्तन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाची सांगता वार्षिक पालखी सोहळ्याने करण्यात आली.मंगळवारी (ता.१४) रात्री बारा वाजता परंपरेने ढोल ताश्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीने या पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. पापदंडेश्वर मंदिरातून श्री.पापदंडेश्वराची पालखी मंगळवारी रात्री १२ वाजता पापदंडेश्वर महाराज की जय, हर हर महादेव, गुरुराज माऊलीच्या जयघोषात प्रस्थान करण्यात आले. श्री.पापदंडेश्वर महाराज पालखीचे गावातील रस्त्यावर सडा, रांगोळी, दिवे लावून स्वागत करण्यात आले. भजनी मंडळीसाठी ठिकठिकाणी रात्री चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पालखीचा कराड गल्लीत (लादनी पुढे) विसावा घेण्यात आला. याठिकाणी रात्रभर मालेवाडी, सारडगाव, सबदाराबाद, बाभळगाव, परळी येथील भारुडकारांच्या भारुडांनी मोठी रंगत आणली, सकाळी पाच वाजेपर्यंत ही भारुडे चालली. बुधवारी सकाळी पालखी मुख्य चौकात (मोठ्या दुकानासमोर) आल्यानंतर गवळणी व सोंगाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात समाजप्रबोधन पर सोंगे सादर करण्यात आली. पालखी मार्गावर भजनी पावले, फुगडी उत्साहात खेळत होते, विशेष म्हणजे महिलाही यात सहभागी झाल्या होत्या. दुपारी दोनच्या सुमारास पापदंडेश्वराची महाआरती करण्यात आली. नंतर भक्तांसाठी थोंटे परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मोठा भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्त व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------------------------------------------

तब्बल पंचवीस तास चालतो पालखी सोहळा

        गाढे पिंपळगाव येथील श्री.पापदंडेश्वर मंदिर हे १२ व्या शतकातील असून हेमाडपंती आहे. येथील पालखी सोहळा अति प्राचीन असून या मंदिराचे संवर्धन होणे आवश्यक आहे, तसेच या मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत सहभागी करणे गरजेचे आहे. तरच या मंदिराचे संवर्धन होईल. हा पालखी सोहळा मध्यरात्री १२ वाजता निघतो, ग्रामप्रदक्षिणा होते. दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता महाआरती होवून महाप्रसादाने सांगता होते. गावातील सर्व लग्न झालेल्या मुली, बाहेर गावी असलेले गावकरी नौकरदार, इतर कामांसाठी बाहेरगावी गेलेले या सोहळ्यासाठी गावात येत असतात.

-----------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या