इमेज
 " मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी; घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन!" परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... "मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी दिली. त्यानंतर ती एकटीच असताना घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरवट ता. परळी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. आरमान मुबारक शेख रा. मिरवट ता. परळी वै हा पीडिता मुलगी ही घरी एकटी असतांना तिच्या घरी जाऊन " तु मुझे रात को खंडोबा मंदीरके पास मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" असे म्हणुन धमकी दिली. पीडितेचा हात धरुन त्याने तिला जवळ ओढुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी धमकी व विनयभंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पुढील तपास पोउपनि निमोणे हे करीत आहेत. 2

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना हा आपल्या प्रगतीचा आधारस्तंभ - डॉ. भरत मुंडे




टोकवाडीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना हा आपल्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे. आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करूया असे आवाहन डॉ. भरत मुंडे यांनी केले.

       भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जय हिंद सामाजिक प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती टोकवाडी येथे मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली.यावेळी गावात मिरवणुक दरम्यान उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन जय हिंद सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मोफत  पाण्याच्या बॉटल चे वाटप करण्यात आले.

       यावेळी पुढे बोलताना आपल्या भाषणात डॉ. भरत मुंडे यांनी कविता सादर करत आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी यावेळी सांगितले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण जगासाठी ज्ञानाचे प्रतीक आहेत. त्यांनी आपल्याला 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा मंत्र दिला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. आजच्या धावपळीच्या युगात शिक्षण हेच एकमेव शस्त्र आहे, ज्याच्या जोरावर आपण प्रगती करू शकतो. बाबासाहेबांचे विचार नुसते भिंतीवर लावू नका, तर ते आपल्या हृदयात आणि कृतीत आणा. एकमेकांना मदत करा, सामाजिक सलोखा राखा असे आवाहन डॉ. भरत मुंडे यांनी केले

     या कार्यक्रमास टोकवाडी चे पंचायत समिती  माजी सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे, टोकवाडीच्या सरपंच गोदावरी ताई राजाराम मुंडे डॉ. राजाराम मुंडे माजी सरपंच मारोतराव मुंडे गुरुजी, नाथराव दादा मुंडे, संभाजी मुंडे (योग प्रशिक्षक),विवेकानंद हॉस्पिटलचे संचालक डॉ. भरत मुंडे , नवनाथ मुंडे,भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे , युवा नेते तुकाराम टी.डी.मुंडे, उद्योजक संतोष मुंडे , टोकवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच बंडूभाऊ काळे डॉ. संदीपान काळे, सोपान तात्या मुंडे, श्रीराम मुंडे, ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य तुकाराम भक्तराम मुंडे, युवा उद्योजक अर्जुन मुंडे,ज्येष्ठ नेते महादेव आण्णा मुंडे , श्रीनिवास मुंडे,प्रदीप घुले, माउली फड, राजाभाऊ गित्ते,गणेश नागरगोजे,दिलीप भालेराव, भरत रोडे , पंडितराव रोडे,अमर रोडे , साहेबराव रोडे, माजी उपसरपंच सुरेश रोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या