खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथांचे दर्शन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी : शिवसेनेचे नेते तथाखासदार डॉ. श्रीकांत एकनाथराव शिंदे यांनी आज श्री क्षेत्र परळी वैजनाथ येथे पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथांचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी वैद्यनाथ नगरीत आगमन झाल्याबद्दल तमाम परळीकरांच्या वतीने त्यांचा माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते हृदय सत्कार करण्यात आला.
दर्शनानंतर खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रभू वैद्यनाथांच्या चरणी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच सर्वांच्या उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. त्यांच्या भेटीमुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. शिंदे यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. परळी वैजनाथ येथे आपण यापूर्वीही दर्शनाला आलो होतो. प्रभू वैजनाथच्या दर्शनाने व परळीकरांच्या प्रेमाने आपण भारावून गेलो असल्याची भावना यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा