तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

इमेज
बारावीच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला, प्रकृती चिंताजनक अंबाजोगाई: अंबाजोगाई येथील ट्युशन एरियात रात्री अभ्यासिका संपवून रूमवर परतणाऱ्या आशिष विनोद माने या १७ वर्षीय विद्यार्थ्यावर दुचाकीवरून आलेल्या तीन गुंडांनी भर रस्त्यावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आशिषला उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे ट्युशन एरियातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.  पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष माने (वय १७, रा. रेपेवाडी, सध्या रा. माळीनगर, अंबाजोगाई) हा १२ वी सायन्सचा विद्यार्थी आहे. तो अंबाजोगाईत भाड्याने रूम घेऊन राहतो. बुधवारी (दि.१७) रात्री १२ वाजेच्या सुमारास तो परिसरातील एका अभ्यासिकेतून अभ्यास करून रूमवर पायी जात असताना हा प्रकार घडला. यावेळी दुचाकीवर आलेल्या साहिल मांदळे, जीतू मांद...

भूसंपादन प्रकरणी नागरिकाची तक्रार ; प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत:न्याय देण्याची मागणी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – भूसंपादन प्रकरणात न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ एका नागरिकाने आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली. संबंधित प्रकरणाची दखल घेत पुढील कार्यवाही सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतरही न्याय मिळत नसल्याची खंत या नागरिकाने व्यक्त केली आहे.
         उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, परळी वैजनाथ (भूसंपादन विभाग) कार्यालयाकडून दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी संबंधित अर्जदारास पत्र देण्यात आले आहे. या पत्रानुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ, औरंगाबाद येथील आदेश क्रमांक 1956/2024 संदर्भात अर्जदाराने न्याय मिळावा व जमिनीच्या बदल्यात योग्य मोबदला मिळावा, यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, अपेक्षित तोडगा न निघाल्याने अर्जदाराने आंदोलनाचा मार्ग अवलंबत 1 मे 2026 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. प्रशासनाने दिलेल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित प्रकरण भूसंपादन अधिनियम 1894 च्या कलम 28-अ अंतर्गत आहे. अर्जदाराचा दावा यापूर्वीच कार्यालयात सादर करण्यात आला असून, त्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणी उच्च न्यायालयातही याचिका दाखल झाली असून न्यायालयाने संबंधित बाबींची तपासणी करून निर्देश दिले आहेत.
          दरम्यान, जिल्हाधिकारी बीड यांच्या स्तरावर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. अर्जदाराला   प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर आत्मदहनासारख्या टोकाच्या भूमिकेऐवजी कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने प्रशासनाकडून त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे असे लेखी आश्वासन दिल्यानंतरही आपली परवड सुरुच असुन प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत तक्रारदार केशव नारायण डाके रा.गोपनपाळे गल्ली यांनी व्यक्त केली असुन आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट