३ जून..... गोपीनाथ गडावर साधेपणाने कार्यक्रम...

इमेज
लोकनेते मुंडे साहेबांचा उद्या स्मृतीदिन ; भजन, प्रसाद, सामाजिक उपक्रमांच आयोजन ना. पंकजा मुंडे, डाॅ. प्रितम मुंडे गोपीनाथ गडावर होणार नतमस्तक परळी वैजनाथ दि. ०२ -- लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा उद्या स्मृतीदिन असून गोपीनाथ गडावर त्यानिमित्त भजन, प्रसाद आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे, डॉ.प्रीतमताई मुंडे  हया परिवारासह उद्या याठिकाणी उपस्थित राहणार आहेत.     सध्याची परिस्थिती आणि देशावर आलेले संकट पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून यंदा मुंडे साहेबांची पुण्यतिथी आपापल्या गावात व घरीच करण्याचे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी केले आहे,  त्यामुळे गोपीनाथ गडावर यंदा भव्य दिव्य कार्यक्रम नसला तरी यादिवशी भजन, प्रसाद व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.   ना. पंकजाताई मुंडे, माजी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे उद्या सकाळी १० वा. गोपीनाथ गडावर पोहोचणार आहेत. याठिकाणी त्या मुंडे साहेबांना आवडणा-या पदार्थाचा नेवैद्य समाधीसमोर अर्पण करणार आहोत. यावेळी आप...

 परळीत अतिक्रमण न हटवल्यास नगर परिषदेसमोर साखळी उपोषण; प्रशासनाला निवेदन



परळी वैजनाथ (प्रतिनिधी):शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशन ते बसवेश्वर कॉलनी रस्ता आणि गायकवाड यांचे घर ते महात्मा बसवेश्वर चौक या भागातील रस्ते व नाल्यांच्या कडेला झालेले अवैध अतिक्रमण प्रशासनाने तत्काळ हटवावे, अन्यथा नगर परिषदेसमोर गांधीगिरी पद्धतीने साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दीपक जोशी यांनी दिला आहे. या संदर्भातील मागण्यांचे एक रीतसर निवेदन आज नगर परिषद प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.शहरातील या प्रमुख रस्ते आणि मुख्य नाल्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना आणि वाहनधारकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण पोलीस स्टेशन ते बसवेश्वर कॉलनी दरम्यानच्या नाली व रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी परिसरात अस्वच्छता पसरली आहे.तसेच गायकवाड यांचे घर ते महात्मा बसवेश्वर चौक या अत्यंत वर्दळीच्या परिसरातील नाला व रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमणांमुळे अपघातांचा धोका कमालीचा वाढला आहे.प्रशासनाला शेवटचा इशाराया गंभीर नागरी समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दीपक जोशी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नगर परिषद कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली व मागण्यांचे निवेदन दिले. जनतेच्या आरोग्यासाठी आणि सुविधेसाठी हे अतिक्रमण त्वरित काढणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने यावर तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत, तर लोकशाही व गांधीगिरीच्या मार्गाने नगर परिषदेसमोर तीव्र साखळी उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा याप्रसंगी दीपक जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे. निवेदन देतेवेळी परिसरातील नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या