३ जून..... गोपीनाथ गडावर साधेपणाने कार्यक्रम...

लोकनेते मुंडे साहेबांचा उद्या स्मृतीदिन ; भजन, प्रसाद, सामाजिक उपक्रमांच आयोजन


ना. पंकजा मुंडे, डाॅ. प्रितम मुंडे गोपीनाथ गडावर होणार नतमस्तक

परळी वैजनाथ दि. ०२ --

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा उद्या स्मृतीदिन असून गोपीनाथ गडावर त्यानिमित्त भजन, प्रसाद आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे, डॉ.प्रीतमताई मुंडे  हया परिवारासह उद्या याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. 


   सध्याची परिस्थिती आणि देशावर आलेले संकट पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून यंदा मुंडे साहेबांची पुण्यतिथी आपापल्या गावात व घरीच करण्याचे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी केले आहे,  त्यामुळे गोपीनाथ गडावर यंदा भव्य दिव्य कार्यक्रम नसला तरी यादिवशी भजन, प्रसाद व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


  ना. पंकजाताई मुंडे, माजी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे उद्या सकाळी १० वा. गोपीनाथ गडावर पोहोचणार आहेत. याठिकाणी त्या मुंडे साहेबांना आवडणा-या पदार्थाचा नेवैद्य समाधीसमोर अर्पण करणार आहोत. यावेळी आपण एक नवीन संकल्प  करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. भाजपचे जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी आपल्या लाडक्या लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार