इमेज
  शेतातील पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने बैल ठार तर शेतकरी, बैल जखमी  दिंद्रुड : धारूर तालुक्यातील तेलगाव शिवारातील शेतकरी जयप्रकाश उत्तमलाल तोष्णीवाल यांच्या पांढरी नामक शेतात सालगडी बैलजोडीने पाळी घालत असताना पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने ताणाला चिटकून एक बैल जागीच ठार झाला तर शेतमजूर व एका बैलाचा प्राण वाचला असून दोघेही किरकोळ जखमी आहेत. तोष्णीवाल यांच्या शेतात असलेल्या विद्युत पोलला ताण दिलेल्या तारेला अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने बैलाला करंट लागून बैल ठार झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. तर दुसरा बैल व सालगडी दिपक थोरात किरकोळ जखमी झाले आहेत. शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

खान कुटुंबीयांना न्याय मिळेल - धनंजय मुंडे

तौहीद खान कुटुंबीयांची धनंजय मुंडेंनी घेतली भेट, तिन्ही अपत्यांच्या शिक्षणाची स्वीकारली जबाबदारी


खान कुटुंबीयांना न्याय मिळेल - धनंजय मुंडे

परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - काही दिवसांपूर्वीच परळीजवळ झालेल्या एका दुर्दैवी हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या मयत तौहीद खान याच्या कुटुंबाची रविवारी सायंकाळी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. यावेळी मयत तौहीद यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत मुंडेंनी तोहीदला श्रद्धांजली वाहिली. तसेच तौहीद याच्या दोन मुली व एक मुलगा अशा तीनही अपत्याच्या शिक्षणाची जबाबदारी धनंजय मुंडे यांनी स्वीकारली असल्याचे कुटुंबियांना स्पष्ट केले. 

दरम्यान मयत तौहीद खान याच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यादृष्टीने जलद गतीने व सर्व बाजूने तपास करून लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्यात यावी, याबाबत पोलिस प्रशासनास श्री. मुंडे यांनी सूचना केल्या. 

मयत तौहीद खान हा घरातील एक कर्ता तरुण गमावल्याने कुटुंबाची अडचण लक्षात घेत धनंजय मुंडे यांनी खान कुटुंबीयांना नाथ प्रतिष्ठान मार्फत एक लाख रुपयांची तात्पुरती आर्थिक मदत रोख स्वरूपात केली आहे. 

खान कुटुंबीयांना न्याय मिळेल यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. तसेच अनेक पिढ्यांपासून परळीत जो भाईचारा जोपासला जात आहे, तो पुढेही अबाधित रहावा, आहे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले. 

याप्रसंगी श्री. मुफ्ती साहेब यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अय्युब भाई पठाण, बाजीराव धर्माधिकारी, उपनगराध्यक्ष राजा खाँ पठाण, जाबेर खाँ पठाण, शकील भाई कुरेशी, अजिज कच्छी, श्रीकृष्ण कराड, श्रीकांत फड, राजेंद्र सोनी, जावेद कुरेशी यांच्या सह स्थानिक पदाधिकारी - नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या