इमेज
  शेतातील पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने बैल ठार तर शेतकरी, बैल जखमी  दिंद्रुड : धारूर तालुक्यातील तेलगाव शिवारातील शेतकरी जयप्रकाश उत्तमलाल तोष्णीवाल यांच्या पांढरी नामक शेतात सालगडी बैलजोडीने पाळी घालत असताना पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने ताणाला चिटकून एक बैल जागीच ठार झाला तर शेतमजूर व एका बैलाचा प्राण वाचला असून दोघेही किरकोळ जखमी आहेत. तोष्णीवाल यांच्या शेतात असलेल्या विद्युत पोलला ताण दिलेल्या तारेला अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने बैलाला करंट लागून बैल ठार झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. तर दुसरा बैल व सालगडी दिपक थोरात किरकोळ जखमी झाले आहेत. शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

 परळी गंगाखेड रोडवरील  पुलाचे काम तात्काळ करण्यात यावे --मनसे 


 परळी- गंगाखेड रोड वरील शक्तीकुंज वसाहत जवळील पुलाचे काम रखडल्यामूळे नागरीकांसाठी तो मृत्युचा सापळा बनला आहे. आज मनसे कडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदन पाठवण्यात आले. पुलाचे काम रखडल्यामुळे अनेक नागरीक या ठिकाणी पडत आहेत. येत्या आठ दिवसात पुलाचे काम चालू नाही झाल्यास मनसे कडून तीव्र आंदोलन करण्या येईल असा इशारा मनसे कडून देण्यात आला.या प्रसंगी जिल्हाउपाध्यक्ष दत्ता दहिवाळ,तालुकाधयक्ष श्रीकांत पाथरकर,तालुकाउपाध्य ऋषिकेश बारगजे, विठ्लदादा झिल्मेवाड, प्रशांत कामाळे, लक्ष्मण शिंदे,आत्माराम खंदारकर,सचीन आघाव, महेश शेप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या