इमेज
  शेतातील पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने बैल ठार तर शेतकरी, बैल जखमी  दिंद्रुड : धारूर तालुक्यातील तेलगाव शिवारातील शेतकरी जयप्रकाश उत्तमलाल तोष्णीवाल यांच्या पांढरी नामक शेतात सालगडी बैलजोडीने पाळी घालत असताना पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने ताणाला चिटकून एक बैल जागीच ठार झाला तर शेतमजूर व एका बैलाचा प्राण वाचला असून दोघेही किरकोळ जखमी आहेत. तोष्णीवाल यांच्या शेतात असलेल्या विद्युत पोलला ताण दिलेल्या तारेला अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने बैलाला करंट लागून बैल ठार झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. तर दुसरा बैल व सालगडी दिपक थोरात किरकोळ जखमी झाले आहेत. शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

 गुंगीचे औषध देऊन  कॉलेज तरुणीवर अत्याचार; तीन लाखांसह साडेनऊ तोळे सोने उकळले, दोन तरुण जेरबंद

अंबाजोगाई: अंबाजोगाई येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर दोघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी अत्याचाराचे फोटो आणि व्हिडिओ कुटुंबाला दाखवण्याची धमकी देत पीडितेकडून तीन लाख रुपयांची रोकड आणि साडेनऊ तोळे सोने लुटले. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पीडित तरुणी अंबाजोगाई येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी राहत असताना तिची ओळख महेश करपे (रा. धारूर) आणि पवन कराड (रा. पांगरी, ता. परळी) या दोन तरुणांशी झाली. हे दोघे तिचा सतत पाठलाग करत असत. एके दिवशी महेश याने तरुणीला जबरदस्तीने मंचुरियन खाऊ घातले, ज्यामध्ये गुंगीचे औषध मिसळले होते. तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पवन कराड यानेही तिला गुंगीचे औषध देऊन पुणे येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. दोन्ही आरोपींनी या कृत्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व नातेवाईकांना दाखवण्याची धमकी देत पीडितेला ब्लॅकमेल करणे सुरू केले. या भीतीपोटी आरोपींनी पीडितेकडून वेळोवेळी तीन लाख रुपये आणि साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने उकळले. हा छळ असह्य झाल्याने शेवटी पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी महेश करपे आणि पवन कराड या दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या