इमेज
  शेतातील पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने बैल ठार तर शेतकरी, बैल जखमी  दिंद्रुड : धारूर तालुक्यातील तेलगाव शिवारातील शेतकरी जयप्रकाश उत्तमलाल तोष्णीवाल यांच्या पांढरी नामक शेतात सालगडी बैलजोडीने पाळी घालत असताना पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने ताणाला चिटकून एक बैल जागीच ठार झाला तर शेतमजूर व एका बैलाचा प्राण वाचला असून दोघेही किरकोळ जखमी आहेत. तोष्णीवाल यांच्या शेतात असलेल्या विद्युत पोलला ताण दिलेल्या तारेला अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने बैलाला करंट लागून बैल ठार झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. तर दुसरा बैल व सालगडी दिपक थोरात किरकोळ जखमी झाले आहेत. शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

पोलिसांनी बनावाचे धागे उलघडले ,तिसरी आरोपी पत्नी

अंजनवती अपघात प्रकरण : खुनाच्या कटात मयताची पत्नी सहभागी



नेकनुर पोलिसांनी बनावाचे धागे उलघडले ,तिसरी आरोपी पत्नी 

नेकनुर, प्रतिनिधी...

नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अंजनवती येथील कामगार युवक अपघाताचा बनाव असलेल्या खुन प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक बाब समोर आली आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू असल्याचा संशय असलेल्या या प्रकरणात सखोल तपासादरम्यान हा प्रकार खुनाचा असल्याचे निष्पन्न झाले दोन आरोपींना नेकनूर पोलिसांनी तळोजा पनवेल येथून ताब्यात घेतले यानंतर मात्र यातील काही धागे उलगडण्यात एपीआय मंगेश साळवे यांना यश आले असून आरोपी प्रियकराच्या मदतीने मयताच्या पत्नीचा खून करण्यात हात असल्याचे समोर आले आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सोमवारी न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंजनवती येथील कामगार युवक किरण बंडू सोनवणे याचा लिंबागणेश अंजनवती रस्त्यावर असलेल्या नाल्यात मृतदेह आढळून आला सुरुवातीला अपघाताचा बनाव दाखवण्यात आला मात्र गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाल्याने नेकनुर पोलिसांनी तपासाला गती देत तीन दिवसातच तळोजा ,पनवेल येथून या प्रकरणातील आरोपी दशरथ परदेशी, धीरज येडे यांना ताब्यात घेतले तपासादरम्यान आरोपींताकडे करण्यात आलेली चौकशी, उपलब्ध तांत्रिक व परिस्थितीजन्य पुरावे, तसेच विविध साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे मयताची पत्नी प्रियांका सोनवणे (वय 25 वर्षे, रा. अंजनवती) हिचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले .

 प्रियांका सोनवणे हिचे मुख्य आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातूनच पतीचा काटा काढण्यासाठी कट रचून त्याच्या खुनास मदत केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानुसार प्रियांका सोनवणे हिला अटक करण्यात आलेली आहे.

 यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींसह महिला आरोपीचा अधिक तपास करण्यासाठी न्यायालयाकडून तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी मिळाली असून, गुन्ह्याचे संपूर्ण षडयंत्र, इतर संबंधित पुरावे तसेच आरोपींच्या भूमिकेबाबत सखोल तपास एपीआय मंगेश साळवे करत आहेत. सोमवारी सायंकाळी केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांनी नेकनूर पोलीस स्टेशनला भेट देऊन तपासाचा आढावा घेत मार्गदर्शन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या