युवराज भास्करराव मुंडे यांना पीएचडी प्रदान
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
युवराज भास्कर मुंडे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान केली आहे. त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून " वारकरी संप्रदायात वंजारी समाजातील संतांचे योगदान : एक ऐतिहासिक अभ्यास " हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. राजर्षी शाहू महाविद्यालय परभणी चे प्राचार्य डॉ. विठ्ठल घुले हे त्यांचे मार्गदर्शक होते. इतिहास विषयात प्राध्यापक पदासाठीची राज्य पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण झाले आहेत.
मानवत येथील के.के.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य कन्हेरवाडी चे भुमिपुत्र डॉ.भास्कर सोपानराव मुंडे यांचे युवराज हे सुपुत्र आहेत. या यशाबद्दल पुणे इन्कमटॅक्स आयुक्त विश्वास सोपानराव मुंडे (IRS), पुणे समाज कल्याण आयुक्त सौ.दीपाताई विश्वासराव मुंडे IAS, न्यायाधीश आनंद सोपानराव मुंडे ,डॉ. कल्याण सोपानराव मुंडे , नारायण फड आदींनी या यशाबद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या यशाबद्दल पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार कत्रुवार, उपाध्यक्ष अनिलराव नखाते, सचिव बालकिशनभाऊ चांडक, कोषाध्यक्ष रामचंद्रराव कत्रुवार, सहसचिव विजयकुमारजी दलाल, संचालक दिलीपराव हिबारे,संजयजी लड्डा, संजयकुमार बांगड, जगदीशजी बांगड,डॉ. आनंदजी कत्रुवार, जयकुमारजी काला, आनंदरामजी मंत्री, ॲड. दिगंबरराव बारटक्के यांनी अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा