इमेज
  शेतातील पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने बैल ठार तर शेतकरी, बैल जखमी  दिंद्रुड : धारूर तालुक्यातील तेलगाव शिवारातील शेतकरी जयप्रकाश उत्तमलाल तोष्णीवाल यांच्या पांढरी नामक शेतात सालगडी बैलजोडीने पाळी घालत असताना पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने ताणाला चिटकून एक बैल जागीच ठार झाला तर शेतमजूर व एका बैलाचा प्राण वाचला असून दोघेही किरकोळ जखमी आहेत. तोष्णीवाल यांच्या शेतात असलेल्या विद्युत पोलला ताण दिलेल्या तारेला अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने बैलाला करंट लागून बैल ठार झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. तर दुसरा बैल व सालगडी दिपक थोरात किरकोळ जखमी झाले आहेत. शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

खळबळजनक घटना......

अनोळखी व्यक्तीचे विहिरीत सापडले प्रेत

   दिंद्रुड :  तेलगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतात एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत सापडल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान सदरील प्रेताचे ओळख अद्याप ही पटली नसल्याने प्रेत अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात शवागारात ठेवण्यात आले आहे.सदरील प्रेता बाबत कुणाला ओळख पटली तर दिंद्रुड पोलीसांशी संपर्क साधावा.असे आवाहन पोलीसांनी केले आहे.


              यासंदर्भात पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की,तेलगाव ता.धारूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सोमवारी सकाळी एका अज्ञात पुरूषाचे कुजलेल्या अवस्थेतील प्रेत विहिरीतील पाण्यात तरंगताना शेतकऱ्यास दिसुन आले.त्यावर संबंधित शेतकऱ्याने दिंद्रुड पोलीसांना याची माहिती दिली.त्यावर दिंद्रुड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.पोलीसांनी परिसराची पाहणी करून विहिरीतील प्रेत पाहिले असता ते पालथे असल्याचे दिसून आले.स्थानिक शेतकरी व नागरिक यांच्या सहकार्याने पोलीसांनी प्रेत विहिरी बाहेर काढले.सदरील प्रेत हे गेल्या चार पाच दिवसांपासून विहिरीत असल्याचा अंदाज आहे.मयताच्या अंगावर पिवळ्या रंगाचे काळेपट्टे असलेला चौकडा शर्ट, गळ्यात लाल काळ्या रंगाचा दोरा, काळ्या रंगाची साधी पॅट विटकरी रंगाची अंडरविअर होती.प्रेत बाहेर काढल्यानंतर प्रेताची खुपच दुर्गंधी सुटली होती.याबाबत स्थानिक शेतकरी व नागरिक यांना प्रेताची ओळख पटवण्यासाठी विचारणा केली असता कुणाला ही याची ओळख पटली नाही.तर कांहींनी ही व्यक्ती वेडसर असल्याचे सांगितले.प्रेताची ओळख पटली नसल्याचे सदरील प्रेत अंबाजोगाई येथील रामानंद तीर्थ रूग्णालयाच्या शवागरात ठेवण्यात आले असून, प्रेता बाबत कोणाला ओळख पटली तर दिंद्रुड पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीसांनी केले.याचा अधिक तपास दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे सह बीट जमादार मनोज झाटे, गायकवाड आदि करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या