तोहीद पठाण यांच्या कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून सांत्वनपर भेट
परळी | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तोहीद पठाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परळी तालुका अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते जीवनराव देशमुख, नगरपरिषद गटनेते नितीन बागवाले, नगरसेवक कादर कुरेशी, श्रीनिवास राऊत, बाबा शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी तोहीद पठाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या. तसेच या दुःखद प्रसंगात कुटुंबीयांनी खंबीर राहावे, अशी भावना व्यक्त करत पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.
या सांत्वनपर भेटीदरम्यान परिसरातील नागरिकांनीही उपस्थित राहून तोहीद पठाण यांना श्रद्धांजली अर्पण केली. या भेटीमुळे कुटुंबीयांना मानसिक आधार मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा