इमेज
  शेतातील पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने बैल ठार तर शेतकरी, बैल जखमी  दिंद्रुड : धारूर तालुक्यातील तेलगाव शिवारातील शेतकरी जयप्रकाश उत्तमलाल तोष्णीवाल यांच्या पांढरी नामक शेतात सालगडी बैलजोडीने पाळी घालत असताना पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने ताणाला चिटकून एक बैल जागीच ठार झाला तर शेतमजूर व एका बैलाचा प्राण वाचला असून दोघेही किरकोळ जखमी आहेत. तोष्णीवाल यांच्या शेतात असलेल्या विद्युत पोलला ताण दिलेल्या तारेला अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने बैलाला करंट लागून बैल ठार झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. तर दुसरा बैल व सालगडी दिपक थोरात किरकोळ जखमी झाले आहेत. शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या 

धारूर, प्रतिनिधी 

धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथे एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . 

स्वाती मारुती देठे (वय १३, रा. आंबेवडगाव) असे मृत मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास स्वाती हिने घरातील पत्र्याच्या लोखंडी अडूला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने धाव घेतली; मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच धारूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मुलीचे वडील यांचे मागील दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते .

दरम्यान, एवढ्या लहान वयात स्वातीने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या