सरस्वती नदी अतिक्रमणमुक्त करा; मांसविक्री बंद निर्णयाची अंमलबजावणी करा- वैद्यनाथ भक्ती मंडळाचे साखळी उपोषण सुरू
परळी (प्रतिनिधी)
परळी नगर पालिकेच्या वतीने सरस्वती नदीवरील अतिक्रमण न हटविता काम सुरु असुन सरस्वती नदी अतिक्रमणमुक्त करावी,शहरात सोमवारी मांसविक्री बंद निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या वतीने नगरपालिकेसमोर सोमवार दि.८ जुन पासुन साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक क्षेत्र असल्याने परळी शहरात देशभरातुन भाविक येत असतात.प्रभु वैद्यनाथाच्या धार्मिक इतिहासात शहरातुन वाहणार्या सरस्वती नदीला मोठे महत्व आहे.या नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्यात आलेली नाहीत.नदीपात्रातील अतिक्रमणे काढुन पात्र मोकळे करावे,सोमवार हा प्रभू श्री वैद्यनाथांचा अत्यंत पवित्र दिवस मानला जात असल्याने धार्मिक भावना, परंपरा आणि भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान राखण्यासाठी नगर परिषदेने दर सोमवारी मांस विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला असुन या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या वतीने दीपक जोशी,कुणाल चाटे,ओमकार मिरकले,अभिजीत गुट्टे,यश शेंद्रे, वैजनाथ वडे आदींनी सोमवार दि.८ जुन पासुन नगरपालिका कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे.या उपोषणास शहरातील व्यापारी नागरीकांनी भेट देत पाठिंबा दर्शवला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा