इमेज
  शेतातील पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने बैल ठार तर शेतकरी, बैल जखमी  दिंद्रुड : धारूर तालुक्यातील तेलगाव शिवारातील शेतकरी जयप्रकाश उत्तमलाल तोष्णीवाल यांच्या पांढरी नामक शेतात सालगडी बैलजोडीने पाळी घालत असताना पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने ताणाला चिटकून एक बैल जागीच ठार झाला तर शेतमजूर व एका बैलाचा प्राण वाचला असून दोघेही किरकोळ जखमी आहेत. तोष्णीवाल यांच्या शेतात असलेल्या विद्युत पोलला ताण दिलेल्या तारेला अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने बैलाला करंट लागून बैल ठार झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. तर दुसरा बैल व सालगडी दिपक थोरात किरकोळ जखमी झाले आहेत. शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

 सेलु आणि लोणी गावच्या नागरिकांची रोडसाठी थेट मंत्रालयात धाव

परळी वै., प्रतिनिधी ...-

सेलु व लोणी गावच्या नागरिकांना रोडसाठी मंत्रालयात धाव घ्यावी लागली.अनेक दिवसांपासुन परळी-सेलु-बोंदरगाव व परळी-लोणी-दत्तवाडी हे दोन्ही ही रोड खड्डामय झाल्याने नागरिकांना खुपच त्रास होत आहे. मा. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पातील तरतूदीनुसार 1000 लोकसंख्या असलेली गावे सिमेंट रोडनी जोडून नागरिकांचा प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले. त्यामुळे  दिनांक 04/02/2026 पासुन ग्राम पंचायत लोणी, ग्राम पंचायत सेलु व ओबीसी परिषद या रस्त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मा. मुख्यमंत्री, ग्रामीण विकास मंत्री, रोजगार हमी मंत्री, पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री, पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद बीड इत्यादींना निवेदने दिली. अद्यापपावेतो रोड न झाल्याने थेट मंत्रालयात जावून दिनांक 05/06/2026 रोजी रोडची निवेदनाद्वारे व्यथा व्यथित करण्यात आली. संबंधीत खात्याने तुमचे काम प्राधान्याने करू असे आश्वासन दिले. 

तेव्हा लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे नागरिकांचा जिव्हाळ्याचा व जीवनमरणाचा प्रश्न आहे परळी-सेलु-बोंदरगाव व परळी-लोणी-दत्तवाडी हा सिमेंट रोड करावा विशेष म्हणजे परभणी जिल्हयातील लोक प्रतिनिधींनी बोंदरगाव पर्यंत रोड केला व दुसऱ्या प्रतिनिधी नैकोट्यापर्यंत रोड निश्चित करणार असे सांगितले तेव्हा या भागातील लोकप्रतिनिधींनी सुध्दा मा. पंकजाताई मुंडे, मा. सुनेत्रा पवार बीड जिल्हा पालकमंत्री, मा. धनंजय मुंडे यांनी त्वरीत प्रश्न सोडवावा अशी आग्रहाची मागणी सेलुचे सरपंच सौ.शिवकन्या फड, लोणीचे भरतराव सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते विलासराव ताटे व सर्व नागरिक यांनी केली आहे. हा प्रश्न सोडवल्यास मुख्यमंत्र्यांच्या अर्थसंकल्पातील तरतूदीचा सुयोग्य विनियोग झाला असे सर्व नागरिक समजतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या