💢 Digital Page 💢
विशेष लेख: ✍️ प्रा.शामसुंदर दासुद मो. 9423790599
जनसामान्यांचे बाजीराव....
समाजातील सामान्य व अतिसामान्य माणूस हा राजकारणाकडे जरा तिरकस नजरेनेच पाहत असतो. त्याच्या मनात राजकारण आणि राजकारणी व्यक्तींविषयी साशंकता असते परंतु काही लोक राजकारणाविषयी सर्वसामान्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात यशस्वी होत असतात. आपले सर्वांचे लाडके नेतृत्व ना. धनंजय मुंडे साहेब हे याबाबतीत सर्वोत्तम उदाहरण आहेत. मुंडे साहेब, वाल्मीक अण्णा आणि साहेबांच्या टीम मधील काही मोजकेच लोक राजकारण हे सामान्य, सर्वसामान्य आणि अतिसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात किंवा त्यांना यात सहभागी करून घेण्यात यशस्वी झाले आहेत. यातीलच एक नाव म्हणजे ज्याचा आज वाढदिवस आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी होय .
साधारणपणे मागच्या 20 ते 22 वर्षापूर्वी मुंडे साहेबांच्या नेतृत्वात बाजीराव भैय्या यांनी युवा मोर्चाच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. आज ही राजकीय वाटचाल यशस्वीतेच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे . ना. मुंडे साहेबांच्या सोबतची त्यांची ही यशस्वी वाटचाल अशीच अविरत पुढे राहील आणि उत्तरोत्तर प्रगती करत राहील याबाबतीत तिळमात्रही शंका नाही.
सन 2011 ला नगरपरिषदेचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर सन 2013 ते सन 2017 या काळात मुंडे साहेबांनी बाजीराव भैयांना नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. नेतृत्वाने बाजीराव यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत नगराध्यक्ष म्हणून परळीकरांच्या कायम स्मरणात राहील असा अतिशय उत्तम कारभार केला आणि मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवले. उत्तम कारभारा बरोबरच यापुढे येणाऱ्या काळात ना. मुंडे साहेबांच्या नेतृत्वात परळी नगर परिषदेची धुरा ही कायम राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील यासाठी त्यांनी जमीन तयार केली. परिणामी त्यानंतरच्या नगरपरिषद निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेसने परळी नगरपरिषदेत विजय संपादन केला.
नगराध्यक्षपदाची यशस्वी कारकीर्द पूर्ण केल्यानंतर साहेबांनी त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपविली. सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बाजीराव भैय्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून केलेले कार्य हे निश्चितच कौतुकास्पद आहे. परळी शहर हे परळी तालुका आणि परळी मतदारसंघासाठी महत्वाचे आणि दिशादर्शक ठिकाण आहे. निवडणुकीच्या काळात परळी शहरात राष्ट्रवादी काँग्रेससाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात किंवा राष्ट्रवादीची हवा निर्माण करण्यात परळी राष्ट्रवादी यशस्वी झाली होती , यात बाजीरावांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून केलेले काम हे निश्चितच मोलाचे ठरलेले आहे. या निवडणुकीत ना. मुंडे साहेबांचा ऐतिहासिक विजय आणि परळीकरांनी साहेबांना दिलेली अभूतपूर्व आघाडी आपल्या सर्वांच्या कायमच स्मरणात राहणारी आहे.
बाजीराव धर्माधिकारी यांना त्यांचे आजोबा स्वर्गीय माणिकराव बाजीराव धर्माधिकारी यांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यामुळे ते त्यांच्या सार्वजनिक जीवनात राजकारण आणि समाजकारण याचा सुरेख समतोल राखण्यात यशस्वी झालेले आहेत. स्व.माणिकराव बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील अनेक गरजू व्यक्तींना मदत केली जाते, यामध्ये रुग्णांसाठी रुग्णवाहिका, रक्तदान शिबिर, अनाथ आश्रमांना मदत, विविध शाळांना शालेय स्तरावर मदत, ज्येष्ठ नागरिकांना विविध माध्यमातून मदत अशा अनेक समाज उपयोगी कार्यातून समाज सेवा करण्याच्या कामात आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून बाजीराव भैया यांचा मोलाचा वाटा असतो. ट्रस्टच्या माध्यमातून होणाऱ्या सेवाभावी मदती बरोबरच राजकीय माध्यमातूनही अनेकांना मदत करण्याचे कार्य बाजीराव भैया यांच्याकडून होत असते. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब आणि साहेबांची राजकीय धुरा सांभाळणारे आदरणीय वाल्मीक अण्णा कराड यांच्या माध्यमातून अनेक लोकांची कामे मार्गी लावण्याचे काम बाजीराव भैय्या हे सतत करत असतात. यातून लोकांची कामे तर मार्गी लागतातच परंतु नेतृत्वावरील लोकांचा विश्वासही द्विगुणित होण्यास मदत होते. एवढेच नाही तर अडचणीत असणाऱ्या परिचित-अपरिचित लोकांना वैयक्तिक स्तरावर देखील बाजीराव भैया कडून मदत केली जात असते. एखाद्याचे दवाखान्याचे काम असेल, मुलीचा विवाह असेल, शैक्षणिक अडचण असेल किंवा अन्य काही अडचण असेल तर बाजीराव त्यासाठी अनेक लोकांना आपल्या वैयक्तिक स्तरावर मदत करत असतात. अतिशय संयमी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचे धनी असणारे बाजीराव भैय्या हे लोकांना मदत ही तेवढ्याच नम्रपणे करत असतात.
सार्वजनिक जीवनात आपल्या कार्यकुशलतेची चुणूक दाखवत बाजीराव भैय्या यांनी अनेक पदे भूषविली आहेत. नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आणि पक्षाचे शहराध्यक्ष या दोन महत्त्वाच्या पदाव्यतिरिक्त वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी अनेक जबाबदाऱ्या स्वीकारल्या आणि यशस्वीरीत्या निभावलेल्या आहेत. वि. दा. सावरकर संस्थेचे चेअरमन, स्व. माणिकराव बाजीराव धर्माधिकारी च चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, डाॅ.बा. आ. मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट मेंबर, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या परळी शाखेचे अध्यक्ष, नवकिरण सुशिक्षित बेरोजगार संस्थेचे अध्यक्ष, नाथ प्रतिष्ठानचे विश्वस्त, जवाहर एज्युकेशन सोसायटीचे संचालक, नवशक्ती क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अशी विविध पदे भूषवणारे बाजीराव भैया हे अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहेत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सन्मान पदक दिल्ली, बाबू जगजीवन राम कला अकादमी पुरस्कार दिल्ली, यासारख्या महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान केला गेला आहे.
अशा या कर्तुत्ववान संयमी सुसंस्कृत मृदुभाषी, नावाने व कर्तुत्वाने बाजीराव असूनही सर्वसामान्यांच्या मनात भैया म्हणून घर करून राहणाऱ्या तरुण नेतृत्वाचा आज वाढदिवस आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात अशीच प्रगती होत राहो, आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो आणि समाजातील गोरगरीब जनतेची, गरजवंतांची सेवा आपल्या हातून आणि ना. मुंडे साहेबांच्या माध्यमातून कायमच घडत राहो ऐवढीच सदिच्छा ...........
✍️प्रा. शाम दासुद मो. 9423790599
- ----------------------------------------विशेष लेख: ✍️ श्रीकांत मांडे मो.९६८९८३५७७७
आश्वासक आधार...........!
राजकीय क्षेत्रातील पद,प्रतिष्ठा आणि डामडौलाचे महत्व व त्याची स्मृती अल्पजीवी असते.सामाजिक क्षेत्रातील विधायक व रचनात्मक कार्याला दातृत्वाचा अलंकार लाभला की व्यक्ती समष्टीसाठी अधिक मोलाची ठरते. अडचणीच्या काळात मदत मिळणारच असा विश्वास प्रत्येकाला वाटेल असे व्यक्तिमत्व म्हणजे स्व.माणिक बाजीरावच असे त्यांच्या काळात अनेकांना वाटत असे,याचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यांचा नातु व माझा पुतण्या बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी आपल्या आजोबांचा वारसा पुढे चालू ठेवण्याचे व्रत स्विकारले आहे.आज समाजातील प्रत्येक घटकाला भैय्या म्हणजे एक आश्वासक आधार वाटतो, हीच त्यांची लौकिक अर्थाने खरी श्रीमंती आहे.
सामाजिक बांधिलकी हा शब्द केवळ उच्चारून नव्हे तर प्रत्यक्ष जगताना कशी अमलात आणावी याचे उदाहरण केवळ भैय्या धर्माधिकारीच ठरू शकतात,त्याचे कारण कविवर्य अनिलांच्या या ओळी....
"अवघ्या अभाग्यांचे अश्रू उभे आमच्या डोळ्यात",
"दुःखितांच्या वेदनेच्या कळा उरात आमच्या हो"
या भावनेने भैय्या धर्माधिकारी सतत कार्यरत आहेत.
स्व.माणिक बाजीराव या नावाचे वलय माझ्यासारख्या ज्येष्ठांना आकर्षित करते, परंतु नातवाच्या तिसऱ्या पिढीने आपल्या आजोबांच्या नावाची प्रतिष्ठा स्वतःच्या कर्तृत्वाने वाढविल्याचे उदाहरण हल्लीच्या काळात सापडणे तसे कठीणच. सांप्रत काळातील राजकारणात स्व-ज्ञाती संख्याबळाचे महत्त्व आणि प्रतिगामी शक्तींना मिळत असलेला राजाश्रय अशा प्रतिकुल परिस्थितीत परळी शहरात सोशल इंजिनिअरिंग चा प्रयोग यशस्वी करून प्रदिर्घ काळ सामाजिक ऐक्य आणि सलोखा टिकवून ठेवणे हे तसे अवघड कार्य,परंतु बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी या क्षेत्रात निष्ठेने काम केले हे लक्षात घेतले पाहिजे. राजकीय क्षेत्रातील यश-अपयशाचे गणित हे निवडणूकांवर बेतलेले असते.प्रतिस्पर्धी,विरोधक,गटा तटाचे म्होरके यांची कारस्थाने सतत चालत असतात.पक्षातील स्थान,नेत्याचा उजवा की डावा हात म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या भानगडीत न पडता निष्ठेने व विश्वासाने आपल्या नेत्याला समर्थ साथ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हा अत्यंत महत्त्वाचा गुण अपवादानेच एखाद्या राजकीय कार्यकर्त्यांत आढळत असतो,त्या दृष्टीने आमचे नेते नामदार धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक बाजीराव भैय्या धर्माधिकारी हे त्या अपवादाची पोकळी भरून काढणारे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत असे स्वतः ना.धनंजय मुंडे साहेब देखील मान्य करतील (अर्थात राजकाणाच्या नियमानुसार अघोषित पणे). बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व ज्येष्ठतेनुसार शुभाशीर्वाद.💐💐*-
- श्रीकांत मांडे
---------------------------------
*कोरोनाच्या संकटामुळे समारंभपूर्वक वाढदिवस साजरा न करण्याचा बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा निर्णय*
🕳️ _सर्वांचे प्रेम सदैव माझ्या साठी उर्जादायी; अनाठायी खर्च टाळण्याचे आवाहन_
परळी वैजनाथ, प्रतिनिधी ---- :
बीड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रावर कोरोनाच्या संकटाचे सावट आहे.अनेक जीवाभावाचे लोक जग सोडून गेले आहेत.या भिषण व भयावह परिस्थितीत संवेदना ठेवत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ११ ऑगस्ट रोजी असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सर्वांचे प्रेम सदैव माझ्यासाठी उर्जादायी असुन वाढदिवसा वरील उत्सवी स्वरुपातील अनाठायी खर्च टाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
कोरोनामुळे सर्वत्र परिस्थिती गंभीर असून परळी शहर देखील कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या परिणामांना सामोरे जात आहे.अनेकजण जीवाभावाचे लोक जग सोडून गेले आहेत. या परिस्थितीत समारंभ पुर्वक वाढदिवस करणे मनस्वी टाळावे वाटते. सर्वांच्या शुभेच्छा - आशीर्वाद मला लढण्याचे बळ देतात, परंतु कोरोनाशी व या भयावह परिस्थितीशी लढण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, कोरोनाला बीड जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातून कायमचे हद्दपार करण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुयात, याच माझ्यासाठी यावर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील असेही बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.
🕳️ _मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन_
परळी वैजनाथ/ प्रतिनिधी......
परळी शहरातील कर्तृत्ववान युवा नेतृत्व व परळीच्या सर्वांगीण विकासाचा मुख्यदुवा म्हणून यशस्वी कारकीर्द निर्माण केलेले माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर राबविण्यात येणार आहे.
बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्र मंडळ, परळी वै. बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 पासून स्व. श्री. मणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह,आंबेवेस, परळी वैजनाथ येथे "रक्तदान शिबीर" आयोजित करण्यात आले आहे.दरवर्षी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. गेल्या 10 वर्षांपासुन सातत्याने घेण्यात येणारा हा सामाजिक उपक्रम ठरला आहे.दर वर्षी नवनविन रक्तदात्यांना प्रोत्साहित करून रक्तदानाचे कार्य रूजविणे बाबत जागृती करणारा परळीतील हा उपक्रम ठरला आहे.रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे.रक्तदानासारख्या उदात्त कार्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन बाजीराव भैया धर्माधिकारी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
-------------------------------
मित्रवर्य, पाठीराखा, आधारवड..
मा. बाजीराव भैय्या धर्माधिकारी
एक कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष, शहराध्यक्ष आणि समाजसेवक कसा असावा, जनतेच्या सेवेत तन मन धनाने स्वतःला कसे झोकून द्यावे याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे भैय्या..
दरवेळी परळीतील नागरिकांच्या संकटकाळी व सुखदुःखात आधार देण्याची आणि जनसामान्यात मिसळून मा. धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वातुन, मार्गदर्शनातून जनसामान्यांची मदत करण्याची तुमची तळमळ, पक्षाच्या ध्येय धोरणातून समजोन्नती करीता विविध कार्य आणि समाजोपयोगी आधार महोत्सव, आरोग्यसेवा सारखे उपक्रम योजने, यासारख्या अनेक कार्यातून तुमच्या जनसेवेचा वसा दिसून येतो.
सर्वात तरुण नगराध्यक्ष, कर्तव्यदक्ष शहराध्यक्ष, समाजातील प्रत्येक घटकाची आपुलकीने मदत करण्यास तत्पर आणि प्रत्येकाला आपल्या परिवारातील सदस्य वाटावा असा भाऊ. पण इतक्या कमी वयात मानाची उच्चतम पदे भूषविणारे भैय्या हे तरुणाई करिता आदर्शच आहेत..
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट मेम्बर, मराठी नाट्य परिषद परळीचे अध्यक्ष, स्वा. विदा सावरकर पतसंस्थेचे चेअरमन, अनेक विविध संघटना आणि संस्थांच्या माध्यमातून लाखो लोकांना मदत करणारे भैय्या आम्हा सर्व मित्रांचा अभिमान आहेत...
भैय्या,, प्रभू वैद्यनाथ आपणास उदंड व निरोगी आयुष्य देवो याच मनःपूर्वक शुभेच्छा💐🎂
✍️ जितेंद्र नव्हाडे, परळी वैजनाथ.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा