पोस्ट्स

परळीकरांच्या वतीने शोभायात्रा काढत मंगलमय स्वागत...

इमेज
  म्हैसूर मठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांनी घेतलं ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन मंगल वाद्यासह जयघोषात महास्वामीजींचे परळीकर भाविकांनी केलं आत्मीय स्वागत वैद्यनाथ मंदिराचा अनादी काळापासूनचा वारसा अतिशय चांगला जतन केल्याचे व्यक्त केले समाधान परळी वैजनाथ, प्रतिनिधी...            म्हैसूर येथील येडतोर श्री योगानंदेश्वर सरस्वती मठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांनी आज (दि.२३) बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले. परळीकर भाविक भक्तांच्या वतीने महास्वामीजींचे जोरदार मंगलमय स्वागत करण्यात आले. मंगल वाद्यांसह जयघोषात संत जगमित्रनागा मंदिर ते वैद्यनाथ मंदिर अशी स्वागत शोभायात्रा काढण्यात आली.            आद्य शंकराचार्यांच्या शृंगेरी शारदा पिठाच्या अद्वैत परंपरेतील महान विभूती आणि अद्वैत वेदांताच्या प्रचार- प्रसारासाठी कार्यरत असणारे, संपूर्ण देशभर प्रवास करून धर्मजागृती संस्कार आणि अध्यात्मिक मार्ग...

पत्नी नगराध्यक्ष, पती नगरसेवक : परळीत दुसऱ्यांदा इतिहास

इमेज
पत्नी नगराध्यक्ष, पती नगरसेवक : सोमनाथ आप्पा हालगे दाम्पत्यानंतर बाजीराव धर्माधिकारी दांपत्यही जोडीने पदावर दिसणार ! परळी वैजनाथ दिनांक 14  परळी वैद्यनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांची नगराध्यक्षपदी जनतेमधून थेट निवडणूक होऊन निवड झाल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक पदासाठी त्यांचे पती बाजीराव धर्माधिकारी यांची निवड निश्चित झाली आहे पती नगरसेवक आणि पत्नी नगराध्यक्ष असे चित्र या निमित्ताने परळीत दुसऱ्यांदा पाहायला मिळणार आहे.  लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद किंवा जिल्हा परिषद नगरपालिकेत पती पत्नी हे दोघेही एकदाच एका सभागृहात अशा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात अनेक घटना आपण पाहिलेले आहेत मात्र एखाद्या नगरपालिकेत पत्नी नगराध्यक्ष आणि पती नगरसेवक अशी घटना परळी मध्ये सलग दुसऱ्यांदा पाहायला मिळणार आहे  सन 2017 मध्ये झालेल्या परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत सौ सरोजिनीताई सोमनाथ आप्पा हलगे या नगराध्यक्ष म्हणून थेट जनतेतून निवडून आल्या होत्या स्वीकृत नगराध्यक्षाच्या वेळी श्री सोमनाथ आप्पा हालगे यांची नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली होती त्या पाठ...

एडवोकेट प्रकाश मराठे यांच्या भाजप निष्ठेला मिळाले फळ

इमेज
  परळी वैजनाथ नगरपरिषदेत अपेक्षितपणे भाजपाकडून नगरसेवक पदासाठी नाव आलेले कोण आहेत प्रणव मराठे? परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         नगरपरिषद उपनगराध्यक्षपद व स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीसाठी आज नगर परिषदेत नगराध्यक्ष सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडत आहे.  यामध्ये अनपेक्षितपणाने भाजपाकडून प्रणव मराठे यांचे नामांकन दाखल झाल्यानंतर कोण आहेत प्रणव मराठे याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. भाजपाचे निष्ठावंत म्हणून सर्व परिचित असलेल्या एड. प्रकाश मराठे यांच्या मुलाला पंकजाताई मुंडे यांनी संधी दिली आहे.         नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीनंतर आता आज दिनांक 15 रोजी परळी नगर परिषदेच्या सभागृहात विशेष सभा पार पडणार आहे. या विशेष सभेत परळी नगर परिषदेचे उपाध्यक्ष पद व नामनिर्देशित सदस्यांच्या निवडी होणार आहेत. सकाळी अकरा वाजल्यापासून ही निवड प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. परळी नगरपरिषद निवडणूक 2025 नंतर आता आज दिनांक 15 रोजी उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्...

भावपूर्ण श्रद्धांजली...

इमेज
  नेमचंद कुरकुट यांना मातृशोक; श्रीमती शंकुतला कुरकुट यांचे निधन परळी–वैजनाथ (प्रतिनिधी) – येथील महावीर डिजिटलचे सर्वेसर्वा नेमचंद कुरकुट यांच्या मातोश्री श्रीमती शंकुतला प्रभाकरराव कुरकुट यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७९ वर्षे होते. श्रीमती शंकुतलाबाई प्रभाकरराव कुरकुट यांचे दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी मारवाडी स्मशानभूमी, शाहू चौक, लातूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.कुरकुट परिवाराच्या दुःखात MB news परिवार सहभागी आहे.

परळीत सोशल इंजिनिअरिंग फांर्म्यूला.....खैसर राजा खान पठाण यांची उपनगराध्यक्ष पदी वर्णी लागणार ?

इमेज
  परळीचे उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच:धनंजय मुंडे देणार मुस्लिम समुदायाला संधी ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        परळी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांच्या निवडी आज दिनांक 15 रोजी होणार आहेत परळी नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना रिपाई व मित्र पक्षाच्या महायुतीचे संपूर्ण बहुमत आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष पद व स्वीकृत नगरसेवकांच्या चारही जागावर महायुतीच्याच उमेदवारांना संधी मिळणार हे निश्चित आहे. प्रमुखपद असलेल्या उपनगराध्यक्षपदी महायुतीकडून कोणाची वर्णी लागणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असताना सोशल इंजिनिअरिंगचा फार्मूला राबवत धनंजय मुंडे हे ही मोठी जबाबदारी मुस्लिम समुदायाला देतील हे अपेक्षित आहे. परळीच्या उपनगराध्यक्षपदी खैसर राजा खान पठाण यांची वर्णी लागणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.      नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीनंतर आता आज दिनांक 15 रोजी परळी नगर परिषदेच्या सभागृहात विशेष सभा पार पडणार आहे. या विशेष सभेत परळी नगर परिषदेचे उपाध्यक्ष पद व नामनिर्देशित सदस्यांच...

कोण होणार परळीचा उपनगराध्यक्ष? स्वीकृत सदस्य म्हणून कोणाला मिळणार संधी?

इमेज
  परळी नगरपरिषद उपाध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीसाठी उद्या होणार बैठक  परळी वैजनाथ, प्रतिनिधी ....नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीनंतर आता आज दिनांक 15 रोजी परळी नगर परिषदेच्या सभागृहात विशेष सभा पार पडणार आहे. या विशेष सभेत परळी नगर परिषदेचे उपाध्यक्ष पद व नामनिर्देशित सदस्यांच्या निवडी होणार आहेत. सकाळी अकरा वाजल्यापासून ही निवड प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.      परळी नगरपरिषद निवडणूक 2025 नंतर आता आज दिनांक 15 रोजी उपनगराध्यक्ष व  नामनिर्देशित सदस्य म्हणून सदस्यांची निवड करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेची ही विशेष सभा पार पडणार असून पीठासन अधिकारी म्हणून अरविंद लाटकर हे निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहेत. सकाळी अकरा वाजल्यापासून ही निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. दुपारी एक वाजता विशेष सभेमध्ये उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांची निवड होणार आहे. आवश्यकता असल्यास या पदांसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात...
इमेज
  नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक सायस गित्ते यांचा सत्कार ; ह. भ. प. प्रभाकर महाराज झोलकर यांची उपस्थिती    परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-          नाथ शिक्षण संस्थाच्या वतीने  सेवानिवृत्त मुख्याध्यापक सायस गित्ते यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त नाथ शिक्षण संस्थाचे सह सचिव प्रदीप खाडे यांनी शाल, फेटा बांधून, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पेढा भरवत सत्कार केला. ह. भ. प. प्रभाकर महाराज झोलकर व उद्योजक सुरेश नाना फड यांची उपस्थिती होती. तसेच सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.             शहरातील विद्यानगर येथील निवृत्तीनाथ निवास येथे बुधवार दि. १४ जानेवारी रोजी नाथ शिक्षण संस्थाच्या वतीने  सेवानिवृत्त मुख्याध्यापक सायस गित्ते यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.  याप्रसंगी नाथ शिक्षण संस्थाचे सह सचिव प्रदीप खाडे यांच्या हस्ते शाल, फेटा बांधून, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन पेढा भरवुन सत्कार करण्यात आला. वाढदिवस अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने विविध...

2020 मधील हल्ल्याचे गहाळ सीसीटीव्ही फुटेज देण्याचीही विनंती

इमेज
  पोलिस संरक्षणाची भगवान साकसमुद्रे यांची मागणी 2020 मधील हल्ल्याचे गहाळ सीसीटीव्ही फुटेज देण्याचीही विनंती परळी / प्रतिनिधी ....परळी येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार भगवान साकसमुद्रे यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेऊन आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत तात्काळ पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासोबतच 06 ऑगस्ट 2020 रोजी आपल्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याशी संबंधित परळी पोलिसांकडून गहाळ झाले असल्याचे सांगण्यात येत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याची लेखी विनंतीही त्यांनी केली आहे. दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी भगवान साकसमुद्रे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत लेखी निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, 2020 मध्ये झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज हे अत्यंत महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे असून, भारतीय पुरावा कायदा कलम 65 (ब) अन्वये प्रमाणपत्र उपलब्ध असतानाही तत्कालीन सेशन कोर्टातील वकील यांनी जाणीवपूर्वक या फुटेजचा न्यायालयात उल्लेख केला नाही. सध्या अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला सुरू असून, सत...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!