संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार

इमेज
  संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार खासदार बजरंग सोनवणे यांचे आंदोलन; हमीभाव, निर्यातमुक्ती व सीबीआय चौकशीची मागणी नवी दिल्ली : देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसद भवन परिसरात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. खासदार बजरंग सोनवणे यांनी हे आंदोलन करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. कांद्याच्या दरातील सततची घसरण आणि निर्यातीवरील निर्बंधांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रासह देशभरातील बाजारपेठेत कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही परत मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या. कांद्याला कायदेशीर हमीभाव लागू करावा, निर्यातीवरील सर्व निर्बंध हटवून कांदा निर्यात पूर्णपणे मुक्त करावी आणि साठेबाजी तसेच धोरणात्मक अनियमिततेबाबत Central Bureau of Investigation (केंद्रीय अन्वेषण विभाग) मार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. “शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही...

एडवोकेट प्रकाश मराठे यांच्या भाजप निष्ठेला मिळाले फळ

 परळी वैजनाथ नगरपरिषदेत अपेक्षितपणे भाजपाकडून नगरसेवक पदासाठी नाव आलेले कोण आहेत प्रणव मराठे?



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        नगरपरिषद उपनगराध्यक्षपद व स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीसाठी आज नगर परिषदेत नगराध्यक्ष सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडत आहे.  यामध्ये अनपेक्षितपणाने भाजपाकडून प्रणव मराठे यांचे नामांकन दाखल झाल्यानंतर कोण आहेत प्रणव मराठे याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. भाजपाचे निष्ठावंत म्हणून सर्व परिचित असलेल्या एड. प्रकाश मराठे यांच्या मुलाला पंकजाताई मुंडे यांनी संधी दिली आहे.

        नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीनंतर आता आज दिनांक 15 रोजी परळी नगर परिषदेच्या सभागृहात विशेष सभा पार पडणार आहे. या विशेष सभेत परळी नगर परिषदेचे उपाध्यक्ष पद व नामनिर्देशित सदस्यांच्या निवडी होणार आहेत. सकाळी अकरा वाजल्यापासून ही निवड प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. परळी नगरपरिषद निवडणूक 2025 नंतर आता आज दिनांक 15 रोजी उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्य म्हणून सदस्यांची निवड करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेची ही विशेष सभा पार पडणार असून उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर हे निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहेत. सकाळी अकरा वाजल्यापासून ही निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. दुपारी एक वाजता विशेष सभेमध्ये उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांची निवड होणार आहे. आवश्यकता असल्यास या पदांसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात येईल. त्यानंतर अधिकृत उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांच्या निवडी जाहीर केल्या जातील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.

         दरम्यान, परळी नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा रिपाई व मित्रपक्ष महायुती ला भरभरून यश मिळालेले आहे. सभागृहात त्यांचे संपूर्ण बहुमत असून या अनुषंगाने उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्य महायुतीच्या गटातूनच होणार हे निश्चित असले तरी महायुती मधून उपनगराध्यक्ष पदावर कोणाला संधी मिळते आणि चार नामनिर्देशित सदस्यांच्या जागांसाठी कोणाची वर्णी लागते याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या नामनिर्देशित सदस्य पदाकरिता एकूण पाच अर्ज दाखल झाले होते त्याची छाननी आज उपविभागीय अधिकारी परळी यांनी केली. या छाननीनंतर हे पाचही अर्ज वैध झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. नामनिर्देशित सदस्य पदाकरिता सर्वश्री देशमुख दीपक रंगनाथराव, देवीप्रसाद चुन्नीलाल पांडे, बाजीराव प्रकाशराव धर्माधिकारी, प्रणव प्रकाश मराठे, अजीज अब्दुल हबीब कच्छी यांच्या नामनिर्देशन पत्रांचा समावेश आहे.

कोण आहेत प्रणव मराठे?

    प्रणव प्रकाशराव मराठे हे सामाजिक बांधिलकी जपणारे युवक असून गेल्या अकरा वर्षापासून ते परळी न्यायालयात यशस्वी वकील म्हणून करतात. एडवोकेट मराठे  हे अभ्यासू वकील म्हणून परिचित आहेत. त्याचप्रमाणे परळीतील प्रसिद्ध विधीज्ञ प्रकाश मराठे यांचे  चिरंजीव आहेत . प्रकाश मराठे हे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे निकटवर्तीय सहकारी राहिलेले आहेत. अनेक वर्ष भाजपाचे निष्ठावंत म्हणून एडवोकेट प्रकाश मराठे यांची ओळख आहे. प्रणव मराठे हे त्यांचे चिरंजीव आहेत. त्याचबरोबर प्रणव मराठे हे सातत्याने सामाजिक उपक्रम राबवतात. उच्चशिक्षित व छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. गेल्या अनेक वर्षापासून संस्कृतीचे जतन करत अतिशय सुरेख बनाने छत्रपती संभाजी महाराज जयंती चे आयोजन करतात. जयंती उत्सव साजरा करताना मिरवणुकीचे वेगळेपण हे त्यांचे वैशिष्ट्य राहिलेले आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असतो. या सर्व सामाजिक कार्याची दखल घेत परळी नगर परिषदेत स्वीकृत सदस्य पदासाठी एडवोकेट प्रणव प्रकाश मराठे यांना भाजपाकडून पंकजाताई मुंडे यांनी संधी दिली आहे. त्यामुळे एक प्रकारे एडवोकेट प्रकाश मराठे यांच्या भाजपा निष्ठेला हे फळ मिळाले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!