संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार
पोलिस संरक्षणाची भगवान साकसमुद्रे यांची मागणी
2020 मधील हल्ल्याचे गहाळ सीसीटीव्ही फुटेज देण्याचीही विनंती
परळी / प्रतिनिधी ....परळी येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार भगवान साकसमुद्रे यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेऊन आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत तात्काळ पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासोबतच 06 ऑगस्ट 2020 रोजी आपल्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याशी संबंधित परळी पोलिसांकडून गहाळ झाले असल्याचे सांगण्यात येत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याची लेखी विनंतीही त्यांनी केली आहे.
दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी भगवान साकसमुद्रे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत लेखी निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, 2020 मध्ये झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज हे अत्यंत महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे असून, भारतीय पुरावा कायदा कलम 65 (ब) अन्वये प्रमाणपत्र उपलब्ध असतानाही तत्कालीन सेशन कोर्टातील वकील यांनी जाणीवपूर्वक या फुटेजचा न्यायालयात उल्लेख केला नाही.
सध्या अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला सुरू असून, सत्य उघडकीस येण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज निर्णायक ठरू शकते. हे की cctv photos मध्ये स्पष्ट दिसत आहेत, आरोपी हातामध्ये हत्यारे (तलवारी घेऊन ) आणि त्या दिवशी घटना झाल्याचे सिद्ध होतं आहे या cctv व्हिडिओ मधून. High court चे वकील, आणि स्क्रेनशॉट शॉट टाका, एवढे स्पष्ट असताना देखील तो पुरावा क्रॉस मध्ये read नाही केला गेला. मात्र परळी (संभाजीनगर) पोलिसांकडून सदर फुटेज गहाळ झाल्याचा आरोप करत, ते तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी साकसमुद्रे यांनी केली आहे.या भेटीवेळी अॅड. के. डी. पाईकराव हेही उपस्थित होते. या प्रकरणामुळे पोलीस दफ्तर सुरक्षिततेतील गंभीर त्रुटी आणि पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा