परळीकरांच्या वतीने शोभायात्रा काढत मंगलमय स्वागत...
पत्नी नगराध्यक्ष, पती नगरसेवक : सोमनाथ आप्पा हालगे दाम्पत्यानंतर बाजीराव धर्माधिकारी दांपत्यही जोडीने पदावर दिसणार !
परळी वैजनाथ दिनांक 14
परळी वैद्यनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांची नगराध्यक्षपदी जनतेमधून थेट निवडणूक होऊन निवड झाल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक पदासाठी त्यांचे पती बाजीराव धर्माधिकारी यांची निवड निश्चित झाली आहे पती नगरसेवक आणि पत्नी नगराध्यक्ष असे चित्र या निमित्ताने परळीत दुसऱ्यांदा पाहायला मिळणार आहे.
लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद किंवा जिल्हा परिषद नगरपालिकेत पती पत्नी हे दोघेही एकदाच एका सभागृहात अशा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात अनेक घटना आपण पाहिलेले आहेत मात्र एखाद्या नगरपालिकेत पत्नी नगराध्यक्ष आणि पती नगरसेवक अशी घटना परळी मध्ये सलग दुसऱ्यांदा पाहायला मिळणार आहे
सन 2017 मध्ये झालेल्या परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत सौ सरोजिनीताई सोमनाथ आप्पा हलगे या नगराध्यक्ष म्हणून थेट जनतेतून निवडून आल्या होत्या स्वीकृत नगराध्यक्षाच्या वेळी श्री सोमनाथ आप्पा हालगे यांची नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली होती त्या पाठोपाठ आता दुसऱ्यांदा धर्माधिकारी दांपत्यांनीही असा विक्रम केला आहे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या निवडून आल्या आज स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाकडून श्री बाजीराव धर्माधिकारी या यांना संधी मिळाली आहे त्यामुळे यापुढे ते या सभागृहात नगरसेवक म्हणून काम करताना दिसतील यानिमित्ताने पती-पत्नी एका सभागृहात पत्नी नगराध्यक्ष तर पती नगरसेवक असे चित्र परळीकरांना दुसऱ्यांदा पाहायला मिळणार आहे
विशेष म्हणजे याआधी बाजीराव धर्माधिकारी यांनी अडीच वर्ष नगराध्यक्ष पद भूषवले आहे आता त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष पाच वर्षासाठी झाले आहेत त्यानिमित्ताने पती-पत्नी या दोघांनाही परळीचे प्रथम नागरिक होण्याची संधी मिळाली असून ही घटना ही राज्याच्या राजकारणात दुर्मिळ समजल्या जाते याशिवाय त्यांचे आजोबा स्वर्गीय माणिकराव धर्माधिकारी बप्पा यांनीही काही काळ परळीचे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले होते या निमित्ताने एकाच कुटुंबातील तिघांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे यावरूनच धर्माधिकारी कुटुंबीयांचे परळीतील महत्त्व अधोरेखित होते
बाजीराव धर्माधिकारी यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळाली असली तरी ती त्यांच्या कर्तुत्वाने मागील जवळपास आठ वर्षांपासून ते परळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून काम करत आहेत छोट्यातील छोटी निवडणूक असो की लोकसभेची निवडणूक असो किंवा एखाद्या बँकेची पतसंस्थेची पक्षाच्या भूमिकेनुसार ते या निवडणुकीत संपूर्णपणे झोकून देऊन काम करताना दिसतात त्यामुळेच पक्षाने त्यांना नगरसेवक पदाची संधी दिल्याची चर्चा आहे दोघेही पती-पत्नी सभागृहात असल्याने आणि मुख्य पद घरात असल्याने धर्माधिकारी या पुढील कारभार कसा करतात याबाबत परळीकर यांना उत्सुकता लागली आहे धर्माधिकारी यांच्या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा