परळीकरांच्या वतीने शोभायात्रा काढत मंगलमय स्वागत...

इमेज
  म्हैसूर मठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांनी घेतलं ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन मंगल वाद्यासह जयघोषात महास्वामीजींचे परळीकर भाविकांनी केलं आत्मीय स्वागत वैद्यनाथ मंदिराचा अनादी काळापासूनचा वारसा अतिशय चांगला जतन केल्याचे व्यक्त केले समाधान परळी वैजनाथ, प्रतिनिधी...            म्हैसूर येथील येडतोर श्री योगानंदेश्वर सरस्वती मठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांनी आज (दि.२३) बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले. परळीकर भाविक भक्तांच्या वतीने महास्वामीजींचे जोरदार मंगलमय स्वागत करण्यात आले. मंगल वाद्यांसह जयघोषात संत जगमित्रनागा मंदिर ते वैद्यनाथ मंदिर अशी स्वागत शोभायात्रा काढण्यात आली.            आद्य शंकराचार्यांच्या शृंगेरी शारदा पिठाच्या अद्वैत परंपरेतील महान विभूती आणि अद्वैत वेदांताच्या प्रचार- प्रसारासाठी कार्यरत असणारे, संपूर्ण देशभर प्रवास करून धर्मजागृती संस्कार आणि अध्यात्मिक मार्ग...

 नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक सायस गित्ते यांचा सत्कार ; ह. भ. प. प्रभाकर महाराज झोलकर यांची उपस्थिती 



 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

        नाथ शिक्षण संस्थाच्या वतीने  सेवानिवृत्त मुख्याध्यापक सायस गित्ते यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त नाथ शिक्षण संस्थाचे सह सचिव प्रदीप खाडे यांनी शाल, फेटा बांधून, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पेढा भरवत सत्कार केला. ह. भ. प. प्रभाकर महाराज झोलकर व उद्योजक सुरेश नाना फड यांची उपस्थिती होती. तसेच सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

            शहरातील विद्यानगर येथील निवृत्तीनाथ निवास येथे बुधवार दि. १४ जानेवारी रोजी नाथ शिक्षण संस्थाच्या वतीने  सेवानिवृत्त मुख्याध्यापक सायस गित्ते यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.  याप्रसंगी नाथ शिक्षण संस्थाचे सह सचिव प्रदीप खाडे यांच्या हस्ते शाल, फेटा बांधून, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन पेढा भरवुन सत्कार करण्यात आला. वाढदिवस अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांकडूनही सेवानिवृत्त मुख्याध्यापक सायस गित्ते यांच्यावर दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव झाला.  यावेळी ह. भ. प. प्रभाकर महाराज झोलकर, नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे व उद्योजक सुरेश नाना फड, सामाजिक कार्यकर्ते माधवराव प्रभाकरराव दहिफळे, पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी निळकंठ दराडे, आदर्श शिक्षक अंकुश फड, राजाभाऊ होळंबे, धोंडीराम चाटे , भागवत चाटे, हरिश्चंद्र सोनवणे सर, मधुकर जोगदंड, कराड सर,  महादेव गित्ते, भगवत देवकते, पत्रकार महादेव गित्ते,  आदी उपस्थिती होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!