नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा - गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण आरएसएसचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सरिता गंगाधरराव फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन, नागपूर द्वारा निर्मित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे आज नागपूर येथे लोकार्पण पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. या डायग्नोस्टिक सेंटरच्या उभारणीसाठी आमदार संदीप जोशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या परिश्रमांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच अल्पावधीत उभ्या राहिलेल्या केंद्राला स्व. गंगाधरराव फडणवीस यांचे नाव देण्यात आले असून वडिलांच्या कार्याचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडल्याचे आणि त्यांच्याकडून समाजकार्याची प्रेरणा मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आरोग्य तपासण्यांसाठीची आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असून लोकांना माफक दरात आरोग्यसेवा दिली जाणार आहे. तसेच राज...