५ एप्रिलपर्यंत स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढण्याचे नागरिकांना आवाहन
चला, आपणच आपले शहर सुटसुटीत आणि शिस्तबद्ध करुया.. हे सर्वांसाठीच आवश्यक आहे! प्रशासनाचे धाडसी पाऊल:परळी वैजनाथ नगरपरिषद राबवणार अतिक्रमण हटाव विशेष मोहीम ५ एप्रिलपर्यंत स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढण्याचे नागरिकांना आवाहन परळी वैजनाथ : प्रतिनिधी... गेल्या अनेक वर्षांपासून परळी शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर अतिक्रमणं मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत. अतिशय सुटसुटीत व वाहतूकीला विना अडथळा असे समर्पक रुंद रस्ते असतांनाही वाहतूक कोंडी, अस्ताव्यस्त रचना आणि बेशिस्त पार्किंग यामुळे सर्वांनाच प्रचंड त्रासातून जावे लागत आहे. त्यामुळे आपणच आपले शहर सुटसुटीत आणि शिस्तबद्ध करुया ,हे सर्वांसाठीच आवश्यक आहे हा तमाम परळीकर नागरिकांचा मनापासून निर्धार आहे.आता यासाठी नगर परिषद प्रशासनानेही धाडसी पाऊल टाकत परळी वैजनाथ नगरपरिषद अतिक्रमण हटाव विशेष मोहीम राबवणार असल्याची सूचना काढली आहे. परळी शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि नागरिकांना भेडसा...