प्रेस कामगार रामभाऊ मुळाटे यांना मातृशोक

इमेज
  श्रीमती मैनाबाई मुळाटे यांचे निधन; आज अंत्यसंस्कार प्रेस कामगार रामभाऊ मुळाटे यांना मातृशोक परळी वैजनाथ :  परळी शहरातील जुने प्रेस कामगार रामभाऊ मुळाटे यांच्या मातोश्री तथा वैद्यनाथ गल्ली, परळी वैजनाथ येथील रहिवासी (सध्या मुक्काम योगेश्वरी कॉलेजच्या पाठीमागे, अंबाजोगाई) श्रीमती मैनाबाई वीरभद्र मुळाटे वय 88 वर्ष यांचे आज दिनांक ३० मार्च रोजी सकाळी १० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ४ वाजता बोरुळ तलाव येथे करण्यात येणार आहे. श्रीमती मैनाबाई मुळाटे या अत्यंत प्रेमळ व मनमिळावू स्वभावाच्या असल्यामुळे परिसरात सर्वपरिचित होत्या. कोष्टी समाजाच्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांत त्या सक्रिय सहभाग घेत असत. पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी त्या नित्यनेमाने जात असत, अशी त्यांची धार्मिक वृत्ती होती. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुन, जावई, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

धक्कादायक प्रकार......

 परळी बसस्थानक परिसरात सापडलेल्या दीड वर्षांच्या मुलीबाबत पोलीसांची शोध मोहीम सुरू



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.

 परळी बसस्थानक परिसरात एका दीड वर्षांच्या मुलीला तिच्या आई-वडिलांनी किंवा पालकांनी उघड्यावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, *दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी* सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास परळी बसस्थानक परिसरात संबंधित मुलगी आढळून आली. याबाबत सालोमन मायकल कसबेकर (वय 52, व्यवसाय – नोकरी, अधीक्षक आशा शिशुगृह, परभणी, रा. चिद्रावर नगर, जुना पेंढगाव रोड, परभणी) यांनी *दिनांक 26 मार्च 2026 रोजी संभाजीनगर परळी वैजनाथ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.*


या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 93 अन्वये गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ए. टी. शिंदे हे करीत आहेत.दरम्यान, तपासादरम्यान संबंधित मुलीचे आई-वडील किंवा पालकांचा शोध घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

जर कोणाला या मुलीबाबत किंवा तिच्या पालकांबाबत कोणतीही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ संभाजीनगर परळी वैजनाथ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट