बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी वैजनाथ नगरीत हे अतिशय महत्त्वाचे...

 परळीत सोमवारी मांस विक्री बंदीची मागणी; केदारी यांचे प्रशासनाला निवेदन




परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

        परळी वैजनाथ येथे प्रत्येक सोमवारी मांस विक्री व सेवनावर कडक बंदी लागू करण्यात यावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते  शिवकुमार केदारी (हिंद नगर, परळी वैजनाथ) यांनी प्रशासनाकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे.

परळी वैजनाथ हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र धार्मिक स्थळ असून, येथे दर सोमवारी हजारो भाविक प्रभू वैद्यनाथ भगवान यांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे त्या दिवशी शहरात भक्तिमय, सात्विक व धार्मिक वातावरण निर्माण होत असते. मात्र, अशा पवित्र दिवशीही शहरात मांस विक्री सुरू असल्याने भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.याबाबत  केदारी यांनी प्रत्यक्ष नगर परिषद परळी वैजनाथ कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले असून, तसेच जिल्हा प्रशासन व राज्यातील मान्यवरांना ईमेलद्वारे निवेदन पाठवून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. निवेदनाची प्रत  जिल्हाधिकारी, बीड,  उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार,  पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे तसेच  आमदार धनंजय मुंडे यांना पाठविण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर  केदारी यांनी प्रशासनाकडे प्रत्येक सोमवारी मांस विक्री, कत्तल, वाहतूक व सेवनावर पूर्ण बंदी लागू करावी, नगर परिषदेमार्फत याबाबत अधिकृत ठराव मंजूर करावा तसेच आदेशाची कडक अंमलबजावणी करून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!