पोस्ट्स

प्रभावी अंमलबजावणीसाठी पर्यावरण व पशुसंवर्धन सचिवांना दिले निर्देश

इमेज
ना. पंकजा मुंडे यांनी मंत्रालयात घेतल्या विभागाच्या मॅरेथॉन बैठका ; संपूर्ण दिवस कामकाजात नद्या व उद्योगांचे प्रदूषण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजनेचा घेतला आढावा प्रभावी अंमलबजावणीसाठी पर्यावरण व पशुसंवर्धन सचिवांना दिले निर्देश मुंबई दि. ०१ --- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेटीगाठी बरोबरच विभागाच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या. पर्यावरणाच्या बैठकीत नद्या व उद्योगांचे प्रदूषण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तर पशुसंवर्धन बैठकीत नव्यानेच सुरू झालेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजनेचा आढावा घेतयोजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पर्यावरण व पशुसंवर्धन सचिवांना निर्देश दिले.    ना. पंकजाताई मुंडे यांचा आजचा संपूर्ण दिवस शासकीय कामकाजात गेला. दुपारी कॅबिनेट बैठक झाल्यानंतर त्यांनी पर्यावरण व पशुसंवर्धन विभागाच्या सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत वेगवेगळ्या विषयांवर एका मागोमाग एक अशा मॅरेथॉन बैठका घेतल्या.    वारंवार प्रदुषण करणाऱ्या उद्योगांची बँक गॅरंटी व दंडाची रक्कम व...
इमेज
सन २०२५ करीता विविध कृषी पुरस्कार अर्ज ऑनलाईन सादर करणेस  १५ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ   महाराष्ट्र राज्य हे कृषि उत्पादन व कृषि उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येतो. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. सदर पुरस्कार माननीय राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते प्रदान करून संबंधितांना सन्मानित करण्यात येते.                             यापूर्वी विविध कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीन...

महाराष्ट्रासाठी गौरव......

इमेज
  मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान नवी दिल्ली,  दि. ३१ : साहित्य अकादमीतर्फे २०२५ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या साहित्य पुरस्कारांचे आज येथे वितरण  करण्यात आले. मराठी भाषेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध चित्रकार व लेखक राजू बाविस्कर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. देशातील मान्यताप्राप्त २४ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले होते.  त्यात मराठी भाषेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध चित्रकार व लेखक  राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेसाठी लेखक राजू बाविस्कर यांना हा सन्मान जाहीर झाला होता. नवी दिल्लीतील कमानी ऑडिटोरियममध्ये झालेल्या या विशेष समारंभात  साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते श्री. बाविस्कर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष विश्वनाथप्रसाद तिवारी,  अकादमीच्या उपाध्यक्षा श्रीमती कुमुद शर्मा, संस्कृती मंत्रालयाचे संचालक अ...

एकाची प्रकृती गंभीर : एकूण पाच जण जखमी

इमेज
  शेतीच्या वादातून चाकूने भोसकून प्राणघातक हल्ला एकाची प्रकृती गंभीर : एकूण पाच जण जखमी केज :- केज तालुक्यातील शिरूर घाट येथे शेतीच्या वादावरून एकाला चाकूने भोकसून प्राणघातक हल्ला केला असल्याने एकजण गंभीर जखमी असून अन्य चौघे देखील जखमी झाले आहेत.     शिरूर घाट तालुका केज येथील राजेंद्र उर्फ राजाभाऊ सुभाष सांगळे यांनी त्यांच्या शेतात मध्ये विहीर खोदकाम केले असून त्याने विहिरीचे खोदकाम करताना त्याने विहिरीच्या अर्धा हिस्सा हा त्याचे चुलते भिमराव रामभाऊ सांगळे यांच्या शेतात खोदकाम केले आहे. त्या कारणा वरून मंगळवार, दि. ३० मार्च रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या केज तालुक्यातील शिरूर घाट येथे भांडण सुरू होते. राजेंद्र उर्फ राजाभाऊ सांगळे हा त्याचे चुलते भिमराव सांगळे, चुलतभाऊ मोहन सांगळे आणि चुलते अर्जुन सांगळे यांना काठीने मारहाण केली त्यात भीमराव सांगळे याच्या डोक्यात मार लागल्याने ते जखमी झाले होते. तसेच राजेंद्र उर्फ राजाभाऊ सांगळे याने चुलत भाऊ मोहन आणि चुलते अर्जुन या दोघांनाही पायावर काठीने मारून जखमी केले. हे भांडण सुरू असताना शेजारी राहत असलेले सुंदर ध...

माजलगाव शहरातील खंडोबा मैदान परिसरातील घटना

इमेज
झोका खेळताना गळफास बसून नऊ वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू माजलगाव ,प्रतिनिधी.... घरातील झुल्याला बांधलेला झोका खेळण्यासाठी मुलगी गेली असता  झोका खेळताना गळ्याला अचानक फास बसून एका  नऊ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना  माजलगाव शहरात घडली. वृंदा समीर रुद्रवार असे या चिमुकलीचे नाव आहे, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.         शहरातील व्यापारी प्रदीप रुद्रवार यांचे खंडोबा मैदान परिसरात घर आहे. मंगळवारी महावीर जयंतीची सुट्टी असल्याने त्यांची नात वृंदा वय ,९ वर्ष ही आपल्या घरातील वरच्या मजल्यावर असलेला झुला खेळण्यासाठी आपल्या छोट्या बहिणीसह वर गेली तेथे खुर्चीवर चढून झोका हातात घेत असताना झोक्याचा तिला गळफास बसला व खुर्ची खाली कलंडली त्यातच तिचा मृत्यू झाला. आपली मुलगी जेवण्यास खाली का येत नाही हे पाहण्यासाठी तिची आई वर आली असता तिला मुलीला गळफास बसल्याचे दिसताच तिने हंबरडा फोडला. तातडीने तिचे आजी, आजोबा,वडील आले व त्यांनी तात्काळ वृंदाला हॉस्पिटलला नेले मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. चुणचुणीत व गोंडस अशी वृंदा येथील ईगलवुड ...

नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी यांच्या हस्ते झालं उद्घाटन

इमेज
परळीतील मोकाट जनावरांवर नियंत्रणासाठी कोंडवाडा सुरु नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी यांच्या हस्ते झालं उद्घाटन परळी वैजनाथ: प्रतिनिधी....     शहरातील मोकाट जनावरांच्या वाढत्या त्रासावर अखेर प्रभावी उपाय म्हणून परळी नगर परिषदेने समता नगर परिसरात ‘कॅटल पाउंड’ (कोंडवाडा) सुरू केला असून, या उपक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते सोमवारी उत्साहात पार पडले. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीच्या सुरळीततेसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.       नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांना दिलासा मिळणार आहे. परळी शहर स्वच्छ, सुरक्षित आणि नियोजनबद्ध करण्याच्या दिशेने कोंडवाडा हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, पाणीपुरवठा सभापती सौ. जयश्री गित्ते, रवींद्र गित्ते,रमेश पवार,अशोक पवार, स्वच्छता निरीक्...

विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण ; नगरपरिषदेच्या खर्चात होणार मोठी बचत...

इमेज
  परळी वैजनाथ नगरपरिषद इमारत व डॉ. भालचंद्र सार्वजनिक वाचनालय सौरऊर्जेवर होणार स्वयंपूर्ण! नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची माहिती परळी वैजनाथ : प्रतिनिधी... परळी वैजनाथ नगरपरिषदेची मुख्य प्रशासकीय इमारत तसेच नव्याने सुरू झालेल्या डॉ. भालचंद्र सार्वजनिक वाचनालय इमारतीवर लवकरच सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे दोन्ही इमारती विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार असून नगरपरिषदेच्या खर्चात मोठी बचत होणार आहे अशी माहिती नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली आहे.           जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत अपारंपारिक ऊर्जा विकास योजनेतून प्रत्येकी 20 किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा यंत्रणा उभारली जाणार आहे. या प्रकल्पामुळे नगरपरिषदेचा विजेवरील खर्च कमी होऊन पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढणार आहे. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळी शहरात विविध विकासकामे सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास स...

विश्वासाची परंपरा, प्रगतीचा नवा अध्याय!.....

इमेज
  विश्वासाची परंपरा, प्रगतीचा नवा अध्याय! स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेला 54 लाख 76 हजार नफा ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावर वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी परळी वैजनाथ /प्रतिनिधी-           शहरातील बँकींग क्षेत्रात ग्राहक सेवेत तत्पर व बँकीग व्यवहारात विश्‍वासार्ह पतसंस्था म्हणुन ओळख असलेल्या स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी   पतसंस्थेने उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे.सरत्या अर्थिक वर्षात संस्थेने विश्वासाची परंपरा, प्रगतीचा नवा अध्याय रचला आहे. स्वा.वि. दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेला 54 लाख 76 हजार  नफा झाला असुन संस्थेची आर्थिक उलाढाल 134 कोटी 57 लाख  इतकी आहे.ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावर ही  वाटचाल सुरु असल्याची भावना अध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी यांनी व्यक्त केली आहे.       31 मार्च 2026 अखेर ची अर्थिकस्थिती स्वा.वि. दा.सावरकर नागरी सहकारी  पतसंस्थेने जाहीर केली आहे. संस्थेची अर्थिकस्थिती पाहता संस्थेने उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे. विशेष म्हणजे अल्पावधीतच पतसंस्थेतील ठेवी-...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!