अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण

इमेज
परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगावचा विजय बनला एमबीबीएस 'डॉक्टर'; गावकऱ्यांकडून भव्य मिरवणूक अन् नागरी सत्कार! ​अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण ​ एसटी चालकाच्या मुलाची गगनभरारी; परिसरातून कौतुकाचा वर्षाव ​परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :        जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल व गरीब परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगाव येथील विजय अरुण गिरी यांनी एमबीबीएस (MBBS) वैद्यकीय शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या दैदिप्यमान यशाबद्दल गाढे पिंपळगावच्या वतीने डॉ. विजय गिरी यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, तसेच ग्रामदैवत श्री पापदंडेश्वर मंदिराच्या सभामंडपात त्यांचा आई-वडिलांसह नागरी सत्कार करण्यात आला.     ​याबाबत सविस्तर वृत्त असे की, गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी तथा राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) चालक अरुण गिरी यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. मात्र, आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन पायावर उभे राहावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांनी मुलगा विजयला शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहित केले व पोट...

विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण ; नगरपरिषदेच्या खर्चात होणार मोठी बचत...

 परळी वैजनाथ नगरपरिषद इमारत व डॉ. भालचंद्र सार्वजनिक वाचनालय सौरऊर्जेवर होणार स्वयंपूर्ण!



नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची माहिती

परळी वैजनाथ : प्रतिनिधी...

परळी वैजनाथ नगरपरिषदेची मुख्य प्रशासकीय इमारत तसेच नव्याने सुरू झालेल्या डॉ. भालचंद्र सार्वजनिक वाचनालय इमारतीवर लवकरच सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे दोन्ही इमारती विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार असून नगरपरिषदेच्या खर्चात मोठी बचत होणार आहे अशी माहिती नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली आहे.

          जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत अपारंपारिक ऊर्जा विकास योजनेतून प्रत्येकी 20 किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा यंत्रणा उभारली जाणार आहे. या प्रकल्पामुळे नगरपरिषदेचा विजेवरील खर्च कमी होऊन पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढणार आहे. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळी शहरात विविध विकासकामे सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था (MEDA) मार्फत या प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाणार असून, लवकरच प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही इमारतींवर सौर यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे विज बिलात बचत होण्यासोबतच पर्यावरण संरक्षणालाही मोठी मदत होणार आहे.या उपक्रमामुळे परळी नगरपरिषदेची इमारती ऊर्जाबचतीकडे वाटचाल करत स्वयंपूर्णतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकणार आहेत.

        महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था यांचा माध्यमातून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन परळी वैजनाथ नगर परिषदेच्या  या दोन्हीही इमारतीवर मंजूर सौर यंत्रणा उभी राहणार आहे.यामुळे या दोन्ही इमारतींचे विज बिल भरावे लागणार नाही. नगर परिषदेची त्यामुळे मोठी आर्थिक बचत होणार असून पर्यावरण संरक्षणालाही मदत होणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मिळवून दिल्याबद्दल ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा नियोजन अधिकारी चिंचाणे, मेडा लातूरचे अधिकारी कुलकर्णी व सर्व सहकार्य करणाऱ्यांचे नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या