विश्वासाची परंपरा, प्रगतीचा नवा अध्याय!.....

 विश्वासाची परंपरा, प्रगतीचा नवा अध्याय!





स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेला 54 लाख 76 हजार नफा

ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावर वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी

परळी वैजनाथ /प्रतिनिधी-

          शहरातील बँकींग क्षेत्रात ग्राहक सेवेत तत्पर व बँकीग व्यवहारात विश्‍वासार्ह पतसंस्था म्हणुन ओळख असलेल्या स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी   पतसंस्थेने उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे.सरत्या अर्थिक वर्षात संस्थेने विश्वासाची परंपरा, प्रगतीचा नवा अध्याय रचला आहे. स्वा.वि. दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेला 54 लाख 76 हजार  नफा झाला असुन संस्थेची आर्थिक उलाढाल 134 कोटी 57 लाख  इतकी आहे.ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावर ही  वाटचाल सुरु असल्याची भावना अध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी यांनी व्यक्त केली आहे.

      31 मार्च 2026 अखेर ची अर्थिकस्थिती स्वा.वि. दा.सावरकर नागरी सहकारी  पतसंस्थेने जाहीर केली आहे. संस्थेची अर्थिकस्थिती पाहता संस्थेने उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे. विशेष म्हणजे अल्पावधीतच पतसंस्थेतील ठेवी-  45 कोटी 67 लाख, राखीव निधी -  9 कोटी 23 लाख, भागभांडवल- 67 लाख 13 हजार, कर्ज-38 कोटी 69 लाख , गुंतवणूक- 15 कोटी 74 लाख , निव्वळ नफा- 54 लाख 76 हजार, खेळते भांडवल-56 कोटी 30 लाख, तर एकूण आर्थिक उलाढाल -134 कोटी 57 लाख इतकी आहे. संस्थेचा सीडी रेशो-  64.03% इतका आहे.पतसंस्थेच्या या प्रगतीशील वाटचालीत सर्व खातेदार, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांचा विश्‍वास हेच पाठबळ आहे असे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले. पतसंस्थेचे उपाध्यक्ष अनिल आष्टेकर,सचिव जितेंद्र नव्हाडे , कोषाध्यक्ष रवि वळसे, संचालक श्रीकांत मांडे,राजाभाऊ मराठे, रवि मुळे, दशरथ होळकर, डॉ.सौ.श्रध्दा देशपांडे, सौ.पद्मश्री धर्माधिकारी यांच्यासह संस्थेचे व्यवस्थापक किरण सावजी यांच्यासह सभासद ,सर्व कर्मचारी वृंद, नित्यसंचय ठेव प्रतिनीधी यांच्या सर्वांच्या योगदानातून ही वाटचाल कायमच प्रगतीशील राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार