अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण

इमेज
परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगावचा विजय बनला एमबीबीएस 'डॉक्टर'; गावकऱ्यांकडून भव्य मिरवणूक अन् नागरी सत्कार! ​अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण ​ एसटी चालकाच्या मुलाची गगनभरारी; परिसरातून कौतुकाचा वर्षाव ​परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :        जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल व गरीब परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगाव येथील विजय अरुण गिरी यांनी एमबीबीएस (MBBS) वैद्यकीय शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या दैदिप्यमान यशाबद्दल गाढे पिंपळगावच्या वतीने डॉ. विजय गिरी यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, तसेच ग्रामदैवत श्री पापदंडेश्वर मंदिराच्या सभामंडपात त्यांचा आई-वडिलांसह नागरी सत्कार करण्यात आला.     ​याबाबत सविस्तर वृत्त असे की, गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी तथा राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) चालक अरुण गिरी यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. मात्र, आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन पायावर उभे राहावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांनी मुलगा विजयला शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहित केले व पोट...

माजलगाव शहरातील खंडोबा मैदान परिसरातील घटना

झोका खेळताना गळफास बसून नऊ वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू


माजलगाव ,प्रतिनिधी.... घरातील झुल्याला बांधलेला झोका खेळण्यासाठी मुलगी गेली असता  झोका खेळताना गळ्याला अचानक फास बसून एका  नऊ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना  माजलगाव शहरात घडली. वृंदा समीर रुद्रवार असे या चिमुकलीचे नाव आहे, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

       शहरातील व्यापारी प्रदीप रुद्रवार यांचे खंडोबा मैदान परिसरात घर आहे. मंगळवारी महावीर जयंतीची सुट्टी असल्याने त्यांची नात वृंदा वय ,९ वर्ष ही आपल्या घरातील वरच्या मजल्यावर असलेला झुला खेळण्यासाठी आपल्या छोट्या बहिणीसह वर गेली तेथे खुर्चीवर चढून झोका हातात घेत असताना झोक्याचा तिला गळफास बसला व खुर्ची खाली कलंडली त्यातच तिचा मृत्यू झाला. आपली मुलगी जेवण्यास खाली का येत नाही हे पाहण्यासाठी तिची आई वर आली असता तिला मुलीला गळफास बसल्याचे दिसताच तिने हंबरडा फोडला. तातडीने तिचे आजी, आजोबा,वडील आले व त्यांनी तात्काळ वृंदाला हॉस्पिटलला नेले मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. चुणचुणीत व गोंडस अशी वृंदा येथील ईगलवुड शाळेत दुसरी वर्गात शिकत होती. तिचा असा अचानक दुर्दैवी मृत्यू झाल्याने रुद्रवार परिवारावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे या घटनेचे वृत्त  कळताच नातेवाईक व लोकांनी मोठी गर्दी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या