अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण

इमेज
परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगावचा विजय बनला एमबीबीएस 'डॉक्टर'; गावकऱ्यांकडून भव्य मिरवणूक अन् नागरी सत्कार! ​अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण ​ एसटी चालकाच्या मुलाची गगनभरारी; परिसरातून कौतुकाचा वर्षाव ​परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :        जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल व गरीब परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगाव येथील विजय अरुण गिरी यांनी एमबीबीएस (MBBS) वैद्यकीय शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या दैदिप्यमान यशाबद्दल गाढे पिंपळगावच्या वतीने डॉ. विजय गिरी यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, तसेच ग्रामदैवत श्री पापदंडेश्वर मंदिराच्या सभामंडपात त्यांचा आई-वडिलांसह नागरी सत्कार करण्यात आला.     ​याबाबत सविस्तर वृत्त असे की, गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी तथा राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) चालक अरुण गिरी यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. मात्र, आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन पायावर उभे राहावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांनी मुलगा विजयला शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहित केले व पोट...

एकाची प्रकृती गंभीर : एकूण पाच जण जखमी

 शेतीच्या वादातून चाकूने भोसकून प्राणघातक हल्ला

एकाची प्रकृती गंभीर : एकूण पाच जण जखमी

केज :- केज तालुक्यातील शिरूर घाट येथे शेतीच्या वादावरून एकाला चाकूने भोकसून प्राणघातक हल्ला केला असल्याने एकजण गंभीर जखमी असून अन्य चौघे देखील जखमी झाले आहेत.

    शिरूर घाट तालुका केज येथील राजेंद्र उर्फ राजाभाऊ सुभाष सांगळे यांनी त्यांच्या शेतात मध्ये विहीर खोदकाम केले असून त्याने विहिरीचे खोदकाम करताना त्याने विहिरीच्या अर्धा हिस्सा हा त्याचे चुलते भिमराव रामभाऊ सांगळे यांच्या शेतात खोदकाम केले आहे. त्या कारणा वरून मंगळवार, दि. ३० मार्च रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या केज तालुक्यातील शिरूर घाट येथे भांडण सुरू होते. राजेंद्र उर्फ राजाभाऊ सांगळे हा त्याचे चुलते भिमराव सांगळे, चुलतभाऊ मोहन सांगळे आणि चुलते अर्जुन सांगळे यांना काठीने मारहाण केली त्यात भीमराव सांगळे याच्या डोक्यात मार लागल्याने ते जखमी झाले होते. तसेच राजेंद्र उर्फ राजाभाऊ सांगळे याने चुलत भाऊ मोहन आणि चुलते अर्जुन या दोघांनाही पायावर काठीने मारून जखमी केले.

हे भांडण सुरू असताना शेजारी राहत असलेले सुंदर धनराज सांगळे व त्यांचा मुलगा बालाजी सुंदर सांगळे हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता राजेंद्र उर्फ राजाभाऊ याने त्यांच्यावरील मागील भांडणाचा राग मनात धरून त्याने सुंदर सांगळे यांच्या पोटात चाकू खुपसला. या चाकू हल्ल्यात सुंदर सांगळे हे गंभीर जखमी झाले आहेत. तर त्याचा मुलगा बालाजी सांगळे हा देखील जखमी  झाला आहे. सुंदर सांगळे यांच्या पोटात चाकूचा खोलवर मार लागला असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. त्यांना बीड येथील स्वामी विवेकानंद हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. दरम्यान प्राणघातक हल्ला झालेले सुंदर सांगळे यांचा मुलगा बालाजी सांगळे यांच्या फिर्यादी वरून केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भांडणात सुंदर सांगळे यांच्यासह त्यांचा मुलगा बालाजी सांगळे, भिमराव सांगळे, मोहन सांगळे आणि अर्जुन सांगळे असे एकूण पाचजण जखमी झाले आहेत.

प्राणघातक हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांची तीन पथके रवाना 

      सदर घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने  राजेंद्र उर्फ राजाभाऊ सांगणे याने सुंदर सांगळे यांच्या पोटात चाकूने भोकसून तो पळून गेला होता. ही माहिती पोलिस निरीक्षक स्वप्नील त्यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलिस उपनिक्षक, उमेश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधासाठी तीन पोलिस पथके रवाना केली होती. त्या पथकात पोलिस उपनिरीक्षक अशोक सोनवणे, पोलिस उपनीक्षक बाळासाहेब रोडे, बाळासाहेब अहंकारे, त्रिंबक सोपने, तांबारे, शिवाजी कागदे, उमेश आघाव, संतोष गित्ते, सिद्दिकी, शाहा यांचा समावेश होता.

आरोपींचा पाठलाग करून घेतले ताब्यात 

     आरोपी राजेंद्र उर्फ राजाभाऊ हा चाकू हल्ला केल्या नंतर फरार होण्याच्या प्रयत्नात असताना त्याला तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशन याचा शोध घेऊन पोलिसांनी नदी नाल्यातून पाठलाग करून ताब्यात घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या