अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण

इमेज
परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगावचा विजय बनला एमबीबीएस 'डॉक्टर'; गावकऱ्यांकडून भव्य मिरवणूक अन् नागरी सत्कार! ​अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण ​ एसटी चालकाच्या मुलाची गगनभरारी; परिसरातून कौतुकाचा वर्षाव ​परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :        जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल व गरीब परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगाव येथील विजय अरुण गिरी यांनी एमबीबीएस (MBBS) वैद्यकीय शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या दैदिप्यमान यशाबद्दल गाढे पिंपळगावच्या वतीने डॉ. विजय गिरी यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, तसेच ग्रामदैवत श्री पापदंडेश्वर मंदिराच्या सभामंडपात त्यांचा आई-वडिलांसह नागरी सत्कार करण्यात आला.     ​याबाबत सविस्तर वृत्त असे की, गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी तथा राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) चालक अरुण गिरी यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. मात्र, आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन पायावर उभे राहावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांनी मुलगा विजयला शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहित केले व पोट...

नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी यांच्या हस्ते झालं उद्घाटन

परळीतील मोकाट जनावरांवर नियंत्रणासाठी कोंडवाडा सुरु

नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी यांच्या हस्ते झालं उद्घाटन

परळी वैजनाथ: प्रतिनिधी....

    शहरातील मोकाट जनावरांच्या वाढत्या त्रासावर अखेर प्रभावी उपाय म्हणून परळी नगर परिषदेने समता नगर परिसरात ‘कॅटल पाउंड’ (कोंडवाडा) सुरू केला असून, या उपक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते सोमवारी उत्साहात पार पडले. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीच्या सुरळीततेसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

      नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांना दिलासा मिळणार आहे. परळी शहर स्वच्छ, सुरक्षित आणि नियोजनबद्ध करण्याच्या दिशेने कोंडवाडा हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, पाणीपुरवठा सभापती सौ. जयश्री गित्ते, रवींद्र गित्ते,रमेश पवार,अशोक पवार, स्वच्छता निरीक्षक राहुल धनवाडे,काळे, सुनिल आदोडे, राज गायकवाड तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      याप्रसंगी नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी सांगितले की, परळी शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. अपघातांची शक्यता वाढत होती. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांतून मोठी मागणी होती.या पार्श्वभूमीवर नागरिकांची मागणी लक्षात घेऊन नगर परिषदेने कोंडवाडा सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा उपक्रम शहराच्या शिस्तबद्ध विकासासाठी महत्त्वाचा टप्पा आहे.रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरे पकडून थेट कोंडवाड्यात ठेवली जातील आणि संबंधित पशुपालकांकडून दंड आकारला जाईल. त्यामुळे पशुपालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत असे आवाहनही त्यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या