जन्मोत्सव सोहळा मोठ्या साजरा करण्याचा निर्धार
भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६: प्रसादगुरु कुलकर्णी यांची अध्यक्षपदी निवड परळी वैजनाथ, प्रतिनिधी) भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाच्या आयोजना संदर्भात आज व्यापक बैठक घेण्यात आली या बैठकीत जन्मोत्सव सोहळ्याची नवीन कार्यकारिणी सर्वांमध्ये निवडण्यात आली यामध्ये भगवान परशुराम जन्मोत्सव 2026 च् अध्यक्षपदी गोरक्षक वेदमूर्ती प्रसाद गुरु कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या साजरा करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समिती परळी वैजनाथ यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात जन्मोत्सव साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या उत्सवाच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेली महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली असून, यामध्ये उत्सवाच्या रूपरेषेसह नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते यावर्षीच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गोरक्षक वेदमूर्ती प्रसाद गुरु कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष: . विठोबा चाटूफळे, सचिव: .अविनाश नवाडे कोषाध्यक्ष: . प्...