भावपूर्ण श्रद्धांजली....

 दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता

कपाळावर ठसठशीत कुंकु, अंगावर ग्रामीण वेशभूषेतलं लुगडं, कष्टाने रापलेलं शरीर अशी तिची वेशभूषा. तिच्याकडे पाहिल्यानंतर ती गावातली साधी बाई वाटते पण ती कोणी साधीसुधी बाई नव्हती तर . आपल्या तिन्ही मुलांपैकी दोन मुलांना शिकून कलेक्टर आयुक्त वगैरे वगैरे प्रशासनातील सर्वोच्च पदावर बसवणारी पावरफुल माता होती. 

एका ऊसतोड कामगाराच्या घरात जन्म झालेल्या आणि तशीच पार्श्वभूमी असलेल्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ताडसोना (ताडसोनना) या छोट्याशा गावातून एक अशी प्रेरणादायी कहाणी आहे, जी प्रत्येक आईच्या सामर्थ्याची जाणीव करून देते. ही कहाणी आहे आसराबाई मुंढे या साध्या शेतकरी मातेची होती. नुकतच त्यांचं वृद्धापकाळाने निधन झाले.  आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे tukaram mundhe आणि अशोक मुंढे ashok mundhe यांच्या त्या मातोश्री होत्या

आसराबाई मुंढे यांनी अत्यंत साध्या परिस्थितीत, शेती करत आणि अनेक अडचणींना सामोरे जात आपल्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व शिकवले. घरची परिस्थिती मर्यादित असली तरी त्यांनी कधीही आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत तडजोड केली नाही. त्यांचा एकच विश्वास होता — “शिक्षण आणि प्रामाणिकपणा माणसाला मोठं बनवतात.” अत्यंत कठीण परिस्थितीत जिद्दीन त्याने आपल्या तीनही मुलांना शिकवलं त्यातील दोन मुलं कलेक्टर आणि कलेक्टर च्या पण वरिष्ठ पदावर पोहोचली आणि एक मुलगा प्राध्यापक आहे.

शिक्षणाचे महत्त्व पटवून दिल्यामुळे याच संस्कारांमुळे त्यांच्या दोन मुलांनी मोठं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णही केलं. त्यांचे सुपुत्र तुकाराम मुंढे (IAS) आणि त्यांचे मोठे बंधू अशोक मुंढे यांनी प्रशासनात उच्च पद गाठत देशसेवेचा मार्ग निवडला.

तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रामाणिक, धाडसी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी जिथे जिथे काम केले तिथे शिस्त, पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर भूमिका घेतली. त्यांच्या कामामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण झाला.

त्यांचे मोठे बंधू अशोक मुंढे यांनीही आपल्या कार्यातून आईच्या संस्कारांचा मान राखत प्रशासनात उल्लेखनीय योगदान दिले

या यशामागे कोणताही मोठा वारसा नव्हता, मोठी संपत्ती नव्हती—होते ते फक्त आईचे संस्कार, कष्ट आणि शिक्षणावर असलेला अढळ विश्वास.


आसराबाई मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार