मोहा येथील घटनेने बीडमध्ये हळहळ

इमेज
  बांधकामावरून पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू बीड प्रतिनिधी —        मोहा ता. परळी येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून खाली पडल्याने एका २८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमोल विलास माने (वय २८, रा. गोविंद नगर, धानोरा रोड, बीड) असे मृत युवकाचे नाव आहे.या दुर्दैवी घटनेची सिरसाळा पोलीस ठाण्यात  बीएनएसएसच्या कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्युची नोंद करण्यात आली असुन पोलीस हवालदार विष्णु नामदेव शेंडगे अधिक तपास करत आहेत .     याबाबत मयताची आई निर्मला विलास माने यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ मे २०२६ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास कंत्राटदार मुस्ताक कादरी व कामगार अक्षय गायकवाड आणि शेख अजीन हे त्यांच्या घरी आले. त्यांनी अमोल हा मोहा येथील बांधकाम साईटवर काम करत असताना दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवरून खाली पडल्याचे सांगितले. त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने शासकीय रुग्णालय, अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र नंतर नाते...

जन्मोत्सव सोहळा मोठ्या साजरा करण्याचा निर्धार

भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६: प्रसादगुरु कुलकर्णी यांची अध्यक्षपदी निवड




परळी वैजनाथ, प्रतिनिधी)

    भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाच्या आयोजना संदर्भात आज व्यापक बैठक घेण्यात आली या बैठकीत जन्मोत्सव सोहळ्याची नवीन कार्यकारिणी सर्वांमध्ये निवडण्यात आली यामध्ये भगवान परशुराम जन्मोत्सव 2026 च् अध्यक्षपदी गोरक्षक वेदमूर्ती प्रसाद गुरु कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या साजरा करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

     भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समिती परळी वैजनाथ यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात जन्मोत्सव साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या उत्सवाच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेली महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली असून, यामध्ये उत्सवाच्या रूपरेषेसह नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते यावर्षीच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गोरक्षक वेदमूर्ती  प्रसाद गुरु कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष: . विठोबा चाटूफळे, सचिव: .अविनाश नवाडे कोषाध्यक्ष: . प्रवीण तोताडे प्रसिद्धी प्रमुख: पत्रकार अनंत (पप्पू )कुलकर्णी व प्रशांत रामदासी. यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व उपस्थितांनी अभिनंदन करत या निवडीला अनुमोदन दिले. यावर्षीचा परशुराम जन्मोत्सव अधिक शिस्तबद्ध, भव्य आणि संस्कृती संवर्धन या  पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प समितीने केला आहे.

या मंगलमय सोहळ्यात समाजातील प्रत्येक बांधवाने आपली उपस्थिती दर्शवून तन-मन-धनाने सहकार्य करावे, असे आवाहन नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसाद गुरु कुलकर्णी व समिती सदस्यांनी केले आहे. या बैठकीला समाजातील प्रतिष्ठित नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या