इमेज
  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी बाबा शेख यांची निवड परळी वैजनाथ | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देत पक्षाने बाबा शेख यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. बीडचे खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष बाबा शिंदे आणि शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. केज येथील पवनसुत निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात नियुक्तीपत्र देऊन बाबा शेख यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच आगामी पक्षकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची शहर व तालुक्यात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांचा विस्तार सुरू असून, नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्ष अधिक जोमाने जनसंपर्क वाढविणार आहे. नियुक्तीनंतर बाबा शेख यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि संघटना बळकट करण्...

नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

 नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम : अंबेवेस येथे नव्या पुलाच्या बांधकामास ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते प्रारंभ




परळी वैजनाथ (प्रतिनिधी):

       जुन्या गावभातील महत्त्वाचा वाहतूक दुवा असलेला पुल आता पुनर्निर्माण होणार आहे. अंबेवेस परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून, नव्या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ आज या भागातील जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आला. जनतेचे प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ नेते नारायणदेव गोपनपाळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ झाला.जुन्या व अरुंद नळकांडी पुलामुळे नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याने शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व शेतकरी यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. 

        नवीन, प्रशस्त व सुरक्षित पुलासाठी  नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती. या मागणीची दखल घेत राज्याचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे तसेच राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या  प्रयत्नांमुळे सन 2025-26 च्या वार्षिक जिल्हा योजना (DPDC) अंतर्गत या पुलासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.आज या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ या भागातील जेष्ठ व मान्यवर नागरिक यांच्या हस्ते  श्रीफळ फोडून करण्यात आला. या कार्यक्रमास परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नगर परिषद बांधकाम सभापती प्रा. पवन मुंडे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक राजाभैय्या पांडे, जयराज देशमुख, नितीन बागवाले आदी उपस्थित होते.दरम्यान, पुलाचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावे यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. तसेच कामात पारदर्शकता राखण्यासाठी पुलाचे थ्री-डी स्टील डिझाईन, मंजूर निधी व कामाचा कालावधी दर्शविणारा माहिती फलक उभारण्याचे निर्देशही नगर अभियंत्यांना देण्यात आले आहेत. नव्या पुलामुळे अंबेवेस परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित व सुलभ होणार असून, हा पूल विकासाचा नवा दुवा ठरणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.पुलाचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावे यासाठी नगर परिषद प्रयत्न करेल.अशी ग्वाही नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी व सर्व न. प. पदाधिकारी यांनी दिली आहे.

नागरिकांनी  पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

     दरम्यान अंबेवेस येथील पूलाला आता नवे रूप येणार असून नवीन पूलाच्या बांधकामासाठी या पुलावरून वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे या पुलाच्या दोन्ही बाजूने असलेल्या पर्यायी रस्त्यांचा उपयोग नागरिकांनी बांधकाम पूर्ण होण्याच्या कालावधीत करावा व नगरपरिषदेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या