मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन....
परळीत सोमवारी 'सद्भावना ईद मिलन संमेलन'चे आयोजन; राष्ट्रीय एकात्मतेचा जागर होणार
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
जातीय सलोखा, प्रेम बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने, परळी येथे 'सद्भावना ईद मिलन संमेलनाचे' आयोजन करण्यात आले आहे. 'जमाअत ए इस्लामी हिंद'च्या वतीने रमजान ईदच्या निमित्ताने आयोजित हा सोहळा येत्या सोमवारी, ६ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणार आहे.

हे संमेलन छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील 'विशेष अतिथी शासकीय विश्रामगृह' येथे संध्याकाळी ६:३० वाजता पार पडेल. नैतिकतेच्या आधारावर सर्व धर्मीय बांधवांना एकत्र आणून सामाजिक सलोखा वाढवणे हा या मागचा मुख्य हेतू आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वारकरी विचार मंच (महाराष्ट्र) चे संस्थापक अध्यक्ष शामसुंदर सोन्नर महाराज उपस्थित राहणार आहेत. तसेच, सद्भावना मंच महाराष्ट्राचे सचिव डॉ. रफिक पारनेरकर हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.या स्नेहसंमेलनास शहरातील नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिरखुर्म्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जमाअत ए इस्लामी हिंद (परळी वै.) चे अध्यक्ष सय्यद इफ्तेखार यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा