पोस्ट्स

रमाई घरकुल योजनेअंतर्गत 154 लाभार्थ्यांना 1 कोटी 1 लाख 81 हजार 250 रुपये निधी वर्ग...

इमेज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद कर्मचाऱ्यांना वेतन व महागाई भत्ता अदा स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांचे साडेतीन महिन्यांचे  1 कोटी 16 लाख रुपये  वेतन प्रदान रमाई घरकुल योजनेअंतर्गत 154 लाभार्थ्यांना 1 कोटी 1 लाख 81 हजार 250 रुपये निधी वर्ग परळी वैजनाथ, प्रतिनिधी......        नगर परिषद कर्मचाऱ्यांना दर महिना वेतन करण्यासाठी सहाय्यक अनुदान प्राप्त होत असते मात्र मार्च महिन्याचे सहाय्यक अनुदान प्राप्त नसतानाही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ना.पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी नगरपरिषदेच्या आस्थापनेवरील अधिकारी ,कर्मचारी यांचे मार्च महिन्याचे वेतन व महागाई भत्ता अदा करण्यात आला आहे.. त्याचबरोबर स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनापैकी साडे तीन महिन्याचे वेतनही या कामगारांना प्रदान करण्यात आले आहे. त्याचबरोबर रमाई घरकुल योजनेअंतर्गत तब्बल 154 लाभार्थ्यांचे निधी यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. यामुळे न. प. कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत असून नगरपरिषद कर्मचाऱ...
इमेज
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन केज: केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये ते एकटेच होते आणि गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटून पलटी झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज रेणापूर पोलिसांनी वर्तविला आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेऊन त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. एका कार्यक्षम आणि तरुण अधिकाऱ्याच्या अशा अचानक जाण्याने महसूल प्रशासनासह संपूर्ण केज तालुक्यावर मोठी शोककळा पसरली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आ. धनंजय मुंडेंचा भक्कम आधार : ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

इमेज
  विकासाला संवेदनशीलतेची जोड : परळीत उभे राहणार  ज्येष्ठ नागरिक भवन; मान्यवरांच्या उपस्थितीत झाले भूमिपूजन आ. धनंजय मुंडेंचा भक्कम आधार : ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –ज्येष्ठांचा सन्मान आणि त्यांच्या आयुष्यभराच्या योगदानाची कदर करत, परळी शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज भवन उभारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रस्तावित असलेल्या ज्येष्ठ नागरिक भवनाचे भूमिपूजन आज ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.           सुमारे २५ लाख रुपयांच्या निधीतून परळी नगर परिषदेच्या माध्यमातून हे भवन उभारले जाणार असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित, आरामदायी आणि सर्व सुविधा असलेले एक हक्काचे सभागृह उपलब्ध होणार आहे. आयुष्यभर कुटुंब आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या वडीलधाऱ्यांना एकत्र येण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि निवांत वेळ घालवण्यासाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे. नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या पाठपुराव्यातून नगरपरि...

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू

इमेज
अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई, दि. ८: राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत देण्यात आल्य़ाची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने राज्यात शेतीचे सुमारे १ लाख १४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यामुळे १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्य़ांच्या शेती आणि शेतीमालाचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना १२८.८६ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. हे नुकसान प्रामुख्याने चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात झाले होते. जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण १,४५,६०६ हेक्टरखालील शेतीचे नुकसान झाले असून २,३३,८९० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पावसामुळे  केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकस...

नारी शक्ती वंदन अधिनियम

इमेज
  विशेष लेख :नारी शक्ती वंदन : महाराष्ट्र अग्रेसर जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी, या एका कवितेच्या ओळी साऱ्यांनाच अवगत असल्या, तरी आपल्या देशात महिलांचा विविध क्षेत्रातील सहभाग हा तसा मर्यादितच राहिला आहे. केवळ साहित्य किंवा इतिहासातील चार- दोन दाखले देऊन हा विषय संपत होता. त्यामुळेच भारतात महिलांचे सशक्तीकरण हा केवळ चर्चेचा विषय होता. शहरी भागात शिक्षणाच्या सुविधांमुळे थोडी बरी स्थिती असली, तरी ग्रामीण भागात मात्र विदारक परिस्थिती होती. मात्र २०१४ नंतर देशात हे चित्र बदलायला सुरुवात झाली. देश सशक्त व्हायचा असेल, तर स्त्री सशक्त झाली पाहिजे हे स्वप्न पाहून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सशक्तीकरणाला प्राधान्य दिले आणि त्यासाठी विविध योजना आणून त्याची अंमलबजावणीही सुरू केली. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या योजना राबवितानाच राज्याच्याही योजना सुरू करून महिला सक्षमीकरणाला बळ दिले. त्यामुळे पाळण्याची दोरी धरणारे हात आता देशाच्या अर्थकारणात आपले भरीव योगदान देऊ लागले आहेत. महिला सशक्तीकरण म्हणजे नेमके काय, तर त्यांनी स्वतःचे निर्णय स्वत...

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन

इमेज
“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” आज विभागीय कार्यशाळा छत्रपती संभाजीनगर, 8 (विमाका): “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” या उपक्रमांतर्गत पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विभागीय कार्यशाळेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे आज (९ एप्रिल २०२६) रोजी सकाळी १० ते सायं. ५. या वेळेत करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते  या कार्यशाळेचे उद्घाटन  होणार आहे.          मंथन सभागृह, एमआयटी कॉलेज, बीड बायपास रोड, सातारा परिसर येथे होणाऱ्या  या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ राहणार आहे. तसेच  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री  मेघना साकोरे- बोर्डीकर , सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक,सार्वजनिक आरोग्य विभागाचे  सचिव  रविंद्रन,सार्वजनिक आरोग्य विभागाचे  आयुक्त  डॉ. कादंबरी बलकवडे,  सार्वजनिक विभागाचे आयुक्त (शहरी आरोग्य) डॉ. सुनील भोकरे,  आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर,   तसेच आरोग्य सेवा स...

आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहा - राजेभाऊ फड

इमेज
कन्हेरवाडी साठवण तलावातील पाणी नदीपात्रात सोडा: परळी - अंबेजोगाई महामार्गावर जिरेवाडी बायपास येथे आज रास्ता रोको   परळी/प्रतिनिधी कन्हेरवाडी साठवण तलावातील पाणी नदीपात्रात सोडण्याच्या मागणीसाठी परळी - अंबेजोगाई महामार्गावर जिरेवाडी बायपास येथे 9 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा कन्हेरवाडीचे माजी सरपंच राजेभाऊ फड यांनी केले आहे. कन्हेरवाडी साठवण तलावातील पाणी नदीपात्रात सोडण्याची  मागणी आता जोर धरू लागली आहे. पाण्याअभावी या भागातील जलाशय कोरडेठाक पडले आहेत. जनावरांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. हा साठवण तलाव अतिशय डोंगराळ भागात असल्याने येथून टँकरने पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे पाणी नदीपात्रात सोडणे हा एकमेव पर्याय आहे. या साठवण तलावातील पाणी नदीपात्रात सोडल्यास याचा फायदा परिसरातील गावांना होतो. कन्हेरवाडी, जिरेवाडी, ब्रम्हवाडी, जलालपूर, बँक कॉलनी, समता नगर, शंकर पार्वती नगर...

तरुणा विरुद्ध विनयभंग आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

इमेज
तरुणाच्या त्रासाला कंटाळून १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेतला तरुणा विरुद्ध विनयभंग आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केज :- वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने घरातील स्लॅबच्या लोखंडी हुकाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली आहे. केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे १० ची परीक्षा दिलेल्या  १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने दि. ७ एप्रिल रोजी आई-वडीला सोबत घरी जेवण केले. त्या नंतर तिचे आई-वडील जनावरांना चारा पाणी करीत असताना त्यांची मुलगी  ही रात्री १०:०० च्या सुमारास घरात गेली आणि तिने आतून कडी लावून दरवाजा बंद करून घेतला. मुलगी आवाज देऊनही घर उघडत नसल्याने आईने दरवाजा शेजारी असलेला काच फोडून आत हात घालून दरवाजा उघडला. तेव्हा अनुजाने घराच्या स्लॅबच्या लोखंडी हुकला तिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आरडाओरड ऐकून शेजारी जमा झाले. या प्रकरणी मुलीचे वडील सूर्यकांत मावकर यांनी दिलेल्या तक्रारी वरून अक्षय भगवान काळे याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. १८६/२०२६, भ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!