आ. धनंजय मुंडेंचा भक्कम आधार : ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

 विकासाला संवेदनशीलतेची जोड : परळीत उभे राहणार  ज्येष्ठ नागरिक भवन; मान्यवरांच्या उपस्थितीत झाले भूमिपूजन



आ. धनंजय मुंडेंचा भक्कम आधार : ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –ज्येष्ठांचा सन्मान आणि त्यांच्या आयुष्यभराच्या योगदानाची कदर करत, परळी शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज भवन उभारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रस्तावित असलेल्या ज्येष्ठ नागरिक भवनाचे भूमिपूजन आज ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

          सुमारे २५ लाख रुपयांच्या निधीतून परळी नगर परिषदेच्या माध्यमातून हे भवन उभारले जाणार असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित, आरामदायी आणि सर्व सुविधा असलेले एक हक्काचे सभागृह उपलब्ध होणार आहे. आयुष्यभर कुटुंब आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या वडीलधाऱ्यांना एकत्र येण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि निवांत वेळ घालवण्यासाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे. नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या पाठपुराव्यातून नगरपरिषदेच्या वतीने आज जेष्ठ नागरिक व मान्यवरांच्या शुभहस्ते या ज्येष्ठ नागरिक भावनांचा भूमिपूजन कार्यक्रम झाला..ज्येष्ठांचा सन्मान हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख असून, त्यांच्या आशीर्वादातूनच विकासाला बळ मिळते. हे भवन केवळ एक इमारत नसून, ज्येष्ठांविषयी कृतज्ञतेचे प्रतीक बनणार आहे. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, डॉ. संतोष मुंडे, वैजनाथ सोळंके, प्रा. मधुकर आघाव, प्रा. पवन मुंडे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष के.डी. उपाडे यांसह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. धनंजय मुंडेंचा भक्कम आधार : ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

-----------------------

   अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ज्येष्ठ नागरिकांना अखेर न्याय मिळाला आहे .आमदार धनंजय मुंडे यांच्या भक्कम आधारामुळे आणि स्थानिक विकास निधीतून ज्येष्ठ नागरिक भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला. समाजासाठी आयुष्य घालवलेल्या आपल्या ज्येष्ठांना सन्मानाने वेळ घालवण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि एकत्र येण्यासाठी आता एक हक्काचे सभागृह उपलब्ध होणार आहे, ही खरोखर आनंदाची बाब आहे. हे भवन म्हणजे केवळ एक इमारत नसून, ज्येष्ठांच्या अनुभवांना आणि सहवासाला नवा आधार देणारे एक स्नेहकेंद्र ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...