रमाई घरकुल योजनेअंतर्गत 154 लाभार्थ्यांना 1 कोटी 1 लाख 81 हजार 250 रुपये निधी वर्ग...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद कर्मचाऱ्यांना वेतन व महागाई भत्ता अदा




स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांचे साडेतीन महिन्यांचे  1 कोटी 16 लाख रुपये  वेतन प्रदान


रमाई घरकुल योजनेअंतर्गत 154 लाभार्थ्यांना 1 कोटी 1 लाख 81 हजार 250 रुपये निधी वर्ग

परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

       नगर परिषद कर्मचाऱ्यांना दर महिना वेतन करण्यासाठी सहाय्यक अनुदान प्राप्त होत असते मात्र मार्च महिन्याचे सहाय्यक अनुदान प्राप्त नसतानाही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ना.पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी नगरपरिषदेच्या आस्थापनेवरील अधिकारी ,कर्मचारी यांचे मार्च महिन्याचे वेतन व महागाई भत्ता अदा करण्यात आला आहे.. त्याचबरोबर स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनापैकी साडे तीन महिन्याचे वेतनही या कामगारांना प्रदान करण्यात आले आहे. त्याचबरोबर रमाई घरकुल योजनेअंतर्गत तब्बल 154 लाभार्थ्यांचे निधी यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. यामुळे न. प. कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत असून नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, मुख्याधिकारी व अधिकाऱ्यांचे आभार मानून सत्कार केला आहे.

       परळी वैजनाथ नगर परिषदेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पूर्वी वेतन द्यावे अशी कर्मचारी तसेच स्वच्छतेच्या कंत्राटी कामगारांची मागणी होती. या अनुषंगाने  ना. पंकजाताई मुंडे व आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन त्यांना प्रदान करण्यात आले आहे. त्याचबरोबर आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता एकूण 18 लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगारांच्या थकीत वेतनापैकी साडेतीन महिन्याचे थकीत वेतन एकूण सुमारे एक कोटी 16 लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे रमाई घरकुल योजनेअंतर्गत तब्बल 154 लाभार्थ्यांचे एक कोटी एक लाख 81 हजार 250 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने परळी वैजनाथ नगरपरिषद नियमक मंडळ व प्रशासनाने अधिकारी ,कर्मचारी, कामगार तसेच रमाई घरकुल योजनेचे लाभार्थी नागरिक यांना स सुखावह अशा प्रकारची भूमिका घेतल्याबद्दल आनंद व्यक्त होत आहे. याबद्दल नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पोपट निगळ, नगरसेवक नितीन रोडे,उपमुख्य अधिकारी संतोष रोडे, न.प.चे लेखापाल सचिन पोकळे, न. प.चे वेतन विभाग प्रमुख व अंतर्गत लेखापाल अजयकुमार कलंत्री यांचे आभार व्यक्त करून त्यांचा सत्कार केला आहे. 

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार

    दरम्यान, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने वेतन व महागाई भत्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पूर्वी द्यावा अशा प्रकारचे निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत नगराध्यक्षा व नगरपरिषद प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याबद्दल संघटनेच्या वतीने नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, मुख्याधिकारी निगळ, उपमुख्य अधिकारी संतोष रोडे , वेतन विभाग प्रमुख अजयकुमार कलंत्री, सचिन पोकळे, गणेश निकम आदी अधिकारी वर्गाचा आभार मानून  सत्कार केला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत जगतकर व सचिव विशाल बनसोडे यांच्यासह सर्व कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!