अंतिम काव्यमय भावना :जीवनातील 'मरणयातना' मांडत पत्करले 'मरण'

इमेज
"केली शिकार माझी, माझ्याच सद्गुणांनी, काटे कुठेच नव्हते, केला दगा फुलांनी!!" कौटुंबिक दु:ख अन् पती -पत्नीच्या नात्यांमधील बेवफाईने त्रासून माध्यकर्मी युवकाने  केली आत्महत्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          परळी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून युवकानं टोकाचं पाऊल उचललं आहे. फेसबूक पोस्ट करत युवकानं आपलं जीवन संपवलं आहे. रामेश्वर गव्हाणे असं या युवकाचं नाव असून, तो परळी तालुक्यातील नागापूर येथील आहे. पत्नी नातेवाईकांपासून त्रास असल्याची माहिती त्याने पोस्टमध्ये दिली आहे. तसेच या पोस्टमध्ये काही डॉक्टर आणि वकिलांच्या नावाचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.          परळी तालुक्यातील नागापूर येथील रामेश्वर गव्हाणे यांनी आपल्या शेतात औषध घेऊन गळफास घेत जीवन संपलं आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. रामेश्वर याने जीवन संपवण्यापूर्वी फेसबुकवर पोस्ट केली. यामध्ये त्यांने त्याची पत्नी नातेवाईकांपासून त्रास असल्याचे लिहिले आहे. तसेच या पोस्टमध्ये काही डॉक्टर आणि वकिलांच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आला...

तरुणा विरुद्ध विनयभंग आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

तरुणाच्या त्रासाला कंटाळून १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेतला





तरुणा विरुद्ध विनयभंग आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

केज :- वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने घरातील स्लॅबच्या लोखंडी हुकाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली आहे.

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे १० ची परीक्षा दिलेल्या  १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने दि. ७ एप्रिल रोजी आई-वडीला सोबत घरी जेवण केले. त्या नंतर तिचे आई-वडील जनावरांना चारा पाणी करीत असताना त्यांची मुलगी  ही रात्री १०:०० च्या सुमारास घरात गेली आणि तिने आतून कडी लावून दरवाजा बंद करून घेतला. मुलगी आवाज देऊनही घर उघडत नसल्याने आईने दरवाजा शेजारी असलेला काच फोडून आत हात घालून दरवाजा उघडला. तेव्हा अनुजाने घराच्या स्लॅबच्या लोखंडी हुकला तिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आरडाओरड ऐकून शेजारी जमा झाले.

या प्रकरणी मुलीचे वडील सूर्यकांत मावकर यांनी दिलेल्या तक्रारी वरून अक्षय भगवान काळे याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. १८६/२०२६, भा. न्या. सं. ७८(१), १०७ आणि पोक्सोचे कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे हे तपास करीत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!