आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहा - राजेभाऊ फड

कन्हेरवाडी साठवण तलावातील पाणी नदीपात्रात सोडा: परळी - अंबेजोगाई महामार्गावर जिरेवाडी बायपास येथे आज रास्ता रोको 




परळी/प्रतिनिधी

कन्हेरवाडी साठवण तलावातील पाणी नदीपात्रात सोडण्याच्या मागणीसाठी परळी - अंबेजोगाई महामार्गावर जिरेवाडी बायपास येथे 9 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा कन्हेरवाडीचे माजी सरपंच राजेभाऊ फड यांनी केले आहे.

कन्हेरवाडी साठवण तलावातील पाणी नदीपात्रात सोडण्याची  मागणी आता जोर धरू लागली आहे. पाण्याअभावी या भागातील जलाशय कोरडेठाक पडले आहेत. जनावरांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. हा साठवण तलाव अतिशय डोंगराळ भागात असल्याने येथून टँकरने पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे पाणी नदीपात्रात सोडणे हा एकमेव पर्याय आहे.

या साठवण तलावातील पाणी नदीपात्रात सोडल्यास याचा फायदा परिसरातील गावांना होतो. कन्हेरवाडी, जिरेवाडी, ब्रम्हवाडी, जलालपूर, बँक कॉलनी, समता नगर, शंकर पार्वती नगर आदी भागातील जळ पातळीत वाढ होऊन दुष्काळी परिस्थितीपासून दिलासा मिळणार आहे.

या आग्रही मागणीसाठी कन्हेरवाडी व परिसरातील नागरीक ग्रामस्थांच्या वतीने परळी - अंबेजोगाई महामार्गावर जिरेवाडी बायपास येथे होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनास आंदोलनास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व कन्हेरवाडीचे माजी सरपंच राजेभाऊ फड यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार